Grampanchayat Election : नांदेडमध्ये काॅंग्रेस नंबर वन, तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर..

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काॅंग्रेसला मिळालेले यश चर्चेचा विषय ठरत आहे. (Ashok Chavan)
Congress Leader Ashok Chavan News, Nanded
Congress Leader Ashok Chavan News, NandedSarkarnama

नांदेड : राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल शिंदे-फडणवीस सरकारच्या पथ्यावर पडले आहेत. भाजपने ग्रामपंचायत निवडणुकीत २७४ ग्रामंपचायती ताब्यात घेत पहिल्या क्रमांकाचा दावा केला आहे. इकडे मराठवाड्यातील (Nanded) नांदेड जिल्ह्यात मात्र अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या नेतृत्वाखाली काॅंग्रेसच नंबर वन ठरला आहे.

जाहीर झालेल्या ८१ ग्रामपंचायतीच्या निकालांपैकी सर्वाधिक २२ ग्रामपंचायती (Congress) काॅंग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. तर २१ ग्रामपंचायतींसह भाजप दुसऱ्या क्रमाकांवर आहे. शिवसेनेने १६ ग्रामपंचायती ताब्यात घेत आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर नांदेडमध्ये शिवसेनेला फुटीचा फटका बसतो की काय? असे वाटत असतांना शिवसनेने चांगले यश मिळवल्याचे दिसते.

तर त्या तुलनेत शिंदे गटाला केवळ ८ ग्रामपंचायती जिंकता आल्या आहेत. राष्ट्रवादी १३ ग्रामपंचायती जिंकत चौथ्या क्रमांकावर गेली आहे. वंचित व प्रहार संघटनेला प्रत्येकी एक ग्रामपंचायत जिंकता आली आहे. काॅंग्रेसचे नेते व माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठत आहेत.

Congress Leader Ashok Chavan News, Nanded
Grampanchyat Election : परभणी जिल्ह्यात ना भाजप, ना शिंदेसेना ; काॅंग्रेस-राष्ट्रवादीची बाजी..

यावर चव्हाणांकडून वेळोवेळी स्पष्टीकरण देखील देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काॅंग्रेसला मिळालेले यश चर्चेचा विषय ठरत आहे. अशोक चव्हाण मुंबईत प्रदेश काॅंग्रेस कमिटीच्या बैठकीत उपस्थितीत होते. तर इकडे त्यांच्या जिल्ह्यातील ग्रामंपचायत निवडणुकीचे निकाल समोर येत होते. राज्यातील सत्तांतरानंतर देखील चव्हाण यांचा करिश्मा नांदेडमध्ये दिसून आला आहे.

ग्रामपंचायत निवडणुक निकाल

शिंदे गट - 8

राष्ट्रवादी - 13

शिवसेना - 16

कांग्रेस - 22

भाजप - 21

वंचित - 1

प्रहार - 1

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in