`अजित पवार मराठवाड्यावर अन्याय करणार हे माहीत होतं... म्हणूनच आम्ही तयारीला लागलो..`

Babanrao Lonikar : Mahaviaks Aghadi सरकारच्या पापाचा घडा आता भरला आहे. मराठवाड्यातील जनता त्यांना सोडणार नाही. Marathwada Water Grid साठी मोठे आंदोलन पुढे करु.
Mla Lonikar-Bhagatsingh Kosyari
Mla Lonikar-Bhagatsingh KosyariSarkarnama

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा वाॅटर ग्रीड योजना बासनात गुंडाळून टाकली. मराठवाड्यातील (Marathwada) दुष्काळ नाहीसा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मंजुर झालेली ही योजना सध्या मरणासन्न अवस्थेत आहे. (Bjp) या योजनेला गती देऊन मराठवाड्यात दुष्काळामुळे होणाऱ्या आत्महत्या, जनतेचा हाल थांबवा अशी मागणी करण्यासाठी भाजपच्या मराठवाड्यातील आमदारांचे शिष्टमंडळ नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना भेटले.

मराठवाडा वाॅटर ग्रीड संदर्भात आपण सरकारशी बोलू, असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले. परतूरचे भाजप आमदार तथा माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी या भेटी संदर्भात माहिती देतांना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. लोणीकर म्हणाले, मराठवाड्यात सातत्याने पडणारा दुष्काळ, त्यातून निर्माण होणारी पाण्याची समस्या, चार हजारांहून अधिक टॅंकरने केला जाणारा पाणीपुरवठा यामुळे मराठवाड्याची ओळख ही टॅंकरवाडा अशी झाली आहे.

ही ओळख पुसण्यासाठी आणि मराठवाडा कायमचा दुष्काळ मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मराठवाड्यात वॉटर ग्रीड करण्याचा निर्णय झाला होता. वर्षभरात जिल्ह्याचा डीपीआर देखील तयार झाला होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबावणे आणि जनतेला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे या हेतूने पहिली वॉटर ग्रीड बनवण्यासाठी इस्राईल सरकारशी करार करून त्यांना पैसे देण्यात आले होते.

या योजनेसाठी १० हजार कोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुर करण्यात आले होते. परंतु राज्यात महाविकास आघाडीच सरकार सत्तेत आले आणि त्यांनी ही योजनाच बंद पाडली. अजित पवार मराठवाड्यावर अन्याय कारणार हे आम्हाला माहित होतं. पवारसाहेबांनी सांगितले की मराठवाडा माझी सासुरवाडी आहे, मात्र तरीही वॉटर ग्रीड रद्द झाली. काल सभागृहात आम्ही मराठवाडा वाॅटर ग्रीड सुरू करा अशी मागणी आम्ही केली.

Mla Lonikar-Bhagatsingh Kosyari
Jalna : काॅंग्रेसची भाजप झाली, तर कैलास गोरंट्याल भाजपचे प्रवक्ते ?

त्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन या योजनेची गरज आणि महत्व त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यांनी सरकारशी बोलण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे. परंतु ठाकरे सरकारने मराठवाड्यातील २ कोटी जनतेचे नुकसान ही योजना रखडवून केले आहे, असा आरोप देखील लोणीकर यांनी केला.

या सरकारच्या पापाचा घडा आता भरला आहे. मराठवाड्यातील जनता त्यांना सोडणार नाही, वाॅटर ग्रीडसाठी आम्ही मोठी आंदोलन या पुढे करु, असा इशारा देतांनाच हे सरकार शंभर टक्के नापास असे सरकार आहे. विनाशकाले विपरित बुद्धी असे या सरकारचे वागणे असल्याचेही लोणीकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com