Abdul Sattar : सत्तारांच्या अडचणी वाढणार? राज्यपालांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Abdul Sattar : मुख्यमंत्री शिंदे अब्दुल सत्तार यांच्याबाबत काय निर्णय घेणार?
Minister Abdul Sattar
Minister Abdul Sattar Sarkarnama

Abdul Sattar News : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभर वातावरण तापले होते. मात्र आता या प्रकरणाची दखल थेट राज्यपालांनी घेतली असून कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

याबाबतची माहिती देणारे ट्वीट राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान (Fouzia Khan) यांनी केले आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्याबाबत मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

अब्दुल सत्तार यांनी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर सत्तारांच्या कृतीमुळे राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. एवढंच नाही तर मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या (NCP) काही महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना भेटून त्यांच्यावर कारवाईसाठी निवेदन दिले होते.

Minister Abdul Sattar
Satara : शशिकांत शिंदे अॅक्शन मोडवर, आमदार महेश शिंदेना जशास तसे उत्तर देणार!

या निवेदनाची राज्यपालांनी अखेर दखल घेतली असून त्याबाबतचे पत्र पुढील कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. याबाबत राज्यपाल महोदयांचे आभार,' असं ट्वीट फौजिया खान यांनी केलं आहे. तर राज्यपालांनी पाठवलेल्या निवेदनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काय निर्णय घेणार? अब्दुल सत्तार यांच्यावर नेमकं काय कारवाई होणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आधी अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. एकीकडे राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी आंदोलने होत आहेत. तर सत्तारांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांच्यावर कारवाईसाठी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवल्यामुळे आश्चर्य देखील व्यक्त करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com