गोरंट्याल यांना दोन्ही मतदारसंघात धूळ चारत खोतकरांची बाजी ; सोसायटी निवडणुकीत भगवा..

गोरंट्याल यांनी आपल्याला ग्रामपंचायत निवडणुक लढवून दाखवा, असे आव्हान दिल्याची आठवण करून देत आपण त्यांचे आव्हान पुर्ण केल्याचे खोतकर यांनी म्हटले आहे. (Shivsena)
Mla Kailas Gorantyal- Arjun Khotkar
Mla Kailas Gorantyal- Arjun KhotkarSarkarnama

जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्चस्व राखण्यासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या तालुक्यातील पानशेंद्रा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सोसायटी निवडणुकीत अर्जुन खोतकर, आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सकाळी मतदानाच्यावेळी शिवसेना (Shivsena) आणि काॅंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने मोठा राडा देखील झाला होता. परंतु या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनची सरशी झाली आहे.

शिवसेनेच्या पॅनलचे सर्व १३ उमेदवार विजजी झाले असून आमदार गोरंट्याल यांच्या पॅनलचा अक्षरश: धुव्वा उडाला आहे. (Jalna) स्वतः आमदार गोरंट्याल हे दोन मतदारसंघातून उभे होते, मात्र त्यांचा दोन्ही ठिकाणी पराभव झाला. शिवसेनेच्या एकतर्फी विजयानंतर अर्जुन खोतकर यांनी आम्ही काॅंग्रेस आणि भाजप अशा दोघांच्या पॅनलचा पराभव केल्याचे सांगत हा नियतीचा खेळ असल्याची प्रतिक्रिया दिली.

आज सकाळपासुन या निवडणुकीच्या मतदानावरून खोतकर आणि गोरंट्याल यांच्या समर्थकांमध्ये धुसफूस सुरू होती. खोतकर आणि गोरंट्याल समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांवर चालून गेले. यावेळी दगडफेकही करण्यात आली. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगवले. त्यामुळे मतदान पार पडल्यानंतर निकालाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

खोतकर-गोरंट्याल या दोघांचे समर्थक मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून होते.अखेर मतमोजणी झाली आणि शिवसेनेच्या पॅनलचे सर्व १३ उमेदवार विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली. तर दुसरीकडे आमदार गोरंट्याल यांचे पॅनल आणि ते स्वतः दोन मतदारसंघात उभे राहून देखील पराभूत झाले. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम राहावे यासाठी खोतकर आणि गोरंट्याल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

Mla Kailas Gorantyal- Arjun Khotkar
अर्जुन खोतकर-गोरंट्याल वाद भडकला : २०२४ चा सामना आतापासूनच रंगलाय

शिवसेनेच्या पॅनलचा दणदणीत विजय झाल्यानंतर गुलाल उधळून शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, विजयानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना खोतकर म्हणाले, गोरंट्याल यांनी आपल्याला ग्रामपंचायत निवडणुक लढवून दाखवा असे आव्हान दिल्याची आठवण करून देत आपण त्यांचे आव्हान पुर्ण केल्याचे म्हटले आहे. केवळ काॅंग्रेसच नाही तर त्यांना मदत करणाऱ्या भाजपचा देखील आपण पराभव केल्याचे खोतकर म्हणाले.

पानशेंद्रा सोसायटीत पानशेंद्रा, धावेडी व थार गावांचा समावेश आहे. रविवारी पानशेंद्रा येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान प्रक्रिया सुरू होती. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल एकाच वेळी मतदान केंद्रासमोर आल्याने कार्यकर्त्यांनी गोधळ घातला. दरम्यान यात बाचाबाची, दगडफेक झाल्याने दोन्ही गटातील समर्थक आक्रमक झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com