ओबीसी आरक्षणाबाबत लवकरच गूड न्यूज येईल : पंकजांना विश्वास

मुंडेंची Gopinath Munde जागा कोण घेणार, त्या लोकांना एकत्र करण्यासाठी गोपीनाथ गड Gopinath gad मी तयार केला. हे माझ्यासाठी नाही, तर हे या लोकांसाठी आहे.
ओबीसी आरक्षणाबाबत लवकरच गूड न्यूज येईल : पंकजांना विश्वास
Pankaja Mundesarkarnama

बीड : ओबीसी आरक्षणावर आलेले संकट दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला बुध्दी व प्रेरणा मिळावी. सरकारने शिवराज सिंह चौहान यांचे अनुकरण करून ओबीसींच्या आरक्षणावर आलेले संकट घालवावे. आम्हाला मोर्चा, मेळावे व हा आमचा नेता म्हणण्यासाठी आरक्षण नको आहे. आमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आरक्षण पाहिजे आहे. ओबीसी आरक्षणाबाबत या सरकारकडून लवकरच गुड न्यूज येईल आणि शिवराजसिंह चौहान यांचे सरकार त्यांना मदत करेल, असा विश्वास माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथगडावरील कार्यक्रमात त्या बोलत होते. यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान याची प्रमुख उपस्थिती होती. पंकजा मुंडे म्हणाल्या, ज्यांच्या नावातच शिवराज आहे, ज्यांच्यावर शिवचा आशीर्वाद आणि जनतेच्या मनावर राज्य, या दोघांचाही सहभाग आहे, त्यांचं मी गोपीनाथ गडावर स्वागत करते. आपलं जे नातं आहे ते माझ्यामुळे नाही तर गोपीनाथ मुंडेंमुळे आहे.

Pankaja Munde
पंकज भुजबळांना धक्का देण्यासाठी सुहास कांदे यांनी आणले दोन आमदार!

इथेच तुम्ही मुंडेंच्या अंत्यसंस्काराला आला होतात, जिथे तुम्ही त्यांचे अंतिम दर्शन घेतले, आज तिथेच कमळाच्या फुलावर त्यांची समाधी आहे. या समाधीचं नाव गोपीनाथ गड आहे. तुम्ही मध्यप्रदेशात जी कमाल केली, ती देशात कुठल्याही राज्यात झाली नाही, तुम्ही ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचं काम केलं, त्यासाठी आम्ही तुम्हाला सन्मानित करतो. आम्ही तुमचे स्वागत हे प्रेम आणि प्रार्थनेने केलं, त्याचा स्वीकार करा. तुमच्यासारखे लोक जेव्हा या गडावर येतात तेव्हा मला माझ्या वडिलांचा अनुभव येतो, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde
आजही असं वाटतं अप्पा, तो दिवस उजाडलाच नसता तर..धनंजय मुंडे भावुक

ओबीसी आरक्षणावर आलेले संकट दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला बुद्धी व प्रेरणा मिळू देत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे अनुकरण करून ओबीसींवर आलेले संकटातून त्यांनी बाजूला करावे. मोर्चा, मेळावे, हा नेता आमचा आहे, यासाठी आम्हाला आरक्षण नको, आमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आरक्षण पाहिजे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार लवकरच ओबीसींबाबत गुड न्यू देईल, असा विश्वास व्यक्त करून त्यांना शिवराज सिंह चौहान यांचे सरकार त्यांना मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Pankaja Munde
सध्या जे चालू आहे ते पाहता, मी इथेच बरी.. असं का म्हणाल्या पंकजा मुंडे ?

आज मला त्या दिवसाची आठवण येते, आज मुंडे साहेबांचं ८ वं पुण्यस्मरण आहे. मोदींच्या सरकारलाही ८ वर्ष पूर्ण झाली आहेत, मोदींच्या सरकारमध्ये मुंडेंचा चेहरा पाहणारे लोक मुंडेंचा सत्कारही करू शकले नाही, इथेच त्यांच्या सत्काराची सभा होणार होती. पण, आम्हाला अंत्यसंस्कार करावे लागले. मुंडेंची जागा कोण घेणार, त्या लोकांना एकत्र करण्यासाठी गोपीनाथ गड मी तयार केला. हे माझ्यासाठी नाही, तर हे या लोकांसाठी आहे. या लोकांना माझ्याकडून काहीही अपेक्षा नाही, यांना फक्त एका व्यक्तीला पाहायचं आहे, जो मुंडेंविषयी प्रेम मनात ठेवतो आणि गरिब, वंचितांचं काम करतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in