Minister Tanaji Sawant On Court Decision : महाविकास आघाडीसोबत जाणं ही अनैतिकता होती, ठाकरेंनी नैतिकतेवर बोलू नये..

Shivsena : विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर जी किंचित सेना आहे, त्यातील अनेक आमदार आमच्यासोबत आलेले असतील.
Minister Tanaji Sawant- Uddhav Thackeray News
Minister Tanaji Sawant- Uddhav Thackeray NewsSarkarnama

Shivsena : सातत्याने आमच्यावर, सरकारवर घटनाबाह्य म्हणून टीका करणाऱ्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांना सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालाने चपराक बसली आहे. नैतिक आणि अनैतिकतेच्या गोष्टी उद्धव ठाकरे यांनी तर करूच नये. २०१९ मध्ये तुमची नैतिकता दिसली, असा टोला राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी लगावला. मुंबईत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया देतांना ते बोलत होते.

Minister Tanaji Sawant- Uddhav Thackeray News
Mla Kailas Patil Ghadge On Court Decision : जनतेच्या न्यायालयावरच आमचा विश्वास, सरकारने राजीनामा देऊन मैदानात यावे..

१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष मेरीटवर घेतील तेव्हा किंचित सेनेचे इतर आमदारही आमच्यासोबत येतील असा दावा देखील (Tanaji Sawant) सावंत यांनी केला. राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. राज्यपाल, अविश्वास ठराव, प्रतोद नेमणूक यावरून सुप्रीम कोर्टाने फटकारले असले तरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचा धोका टळला.

यावर आता राज्यभरातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. शिंदे यांच्या उठावात महत्वाची भूमिका बजावणारे राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल महाविकास आघाडीने स्वीकारावा असे आवाहन केले आहे. (Marathwada) सावंत म्हणाले, नैतिकतेचा दाखला देत उद्धव ठाकरे शिंदे-फडणवीसांना राजीनामा देण्याचे आवाहन करत आहेत.

मुळात नैतिकतेवर बोलण्याचा ठाकरेंना अधिकारच नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत लढले. राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर महाविकास आघाडीसोबत जात सत्ता स्थापन केली ती अनैतिकता होती. आम्ही शिंदे यांच्यासोबत ४० अधिक १० असे पन्नास आमदार आणि १३ खासदारांनी उठाव करून नैतिक निर्णय घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असा तो निर्णय होता.

त्यामुळे आता नैतिकतेच्या गप्पा ठाकरेंनी मारू नये. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर उलटसुलट चर्चा करण्यापेक्षा त्यांनी मोठ्या मनाने तो स्वीकारावा, असा सल्ला देखील सावंत यांनी दिला. १६ आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेणार आहेत, ते तो मेरीटवर घेतील, त्याबद्दल आम्हाला चिंता नाही. येत्या महिनाभरात महाराष्ट्रात आणखी बऱ्याच घडामोडी घडतील. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर जी किंचित सेना आहे, त्यातील अनेक आमदार आमच्यासोबत आलेले असतील, असा दावा देखील सावंत यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com