Aurangabad : समन्यायी वाटप पद्धतीने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी द्या..

मराठवाड्यात पाणी वापर संस्थेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. ( Marathwada News)
Protest For Marathwada Water News, Aurangabad
Protest For Marathwada Water News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : मराठवाड्याच्या हक्काचे २८.२५ टीएमसी पाणी मंजूर करून घेवून नव्याने मंजुर झालेले १९.२९ टीएमसी पाणी समन्यायी पद्धतीने द्या, व अन्य मागण्यांसाठी मराठावाडा बहुजन विकास आघाडीच्या वतीने (Marathwada) मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाच्या पुर्वसंध्येला बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

गोदावरी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाबाहेर शेकडोंच्या गर्दीत माजी जिल्हा परिषद सदस्य व मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. (Aurangabad) दिवसभर चाललेल्या या आंदोलनाने अनेकांचे लक्ष वेधले होते.(Water Release) विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादमध्ये असतांनाच हे आंदोलन सुरू होते.

यावेळी गोदावरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात रमेश गायकवाड यांनी विविध मागण्या केल्या. यात प्रामुख्याने जलसंपदा विभागातील रिक्त पदे सरळ भरती सेवाच्या माध्यमातून तातडीने भरावीत, १९.२९ टीएमसी पाणी मंजुर झाल्यानंतर जलसंपदा विभागामार्फत काढण्यात आलेली सगळी टेंडर रद्द करावीत, या मागण्यांचा समावेश आहे.

६ आॅक्टोबर १९७५ रोजी देशातील धरणातील पाण्याची मोजणी जेव्हा केली गेली, तेव्हा मराठवाड्यातील माजलगांव धरणातील पाणी मोजले गेले नव्हते. त्यामुळे मराठवाड्यात नवे प्रकल्प आले नाही. परिणामी तरुणांना रोजगार मिळाला नाही, तरी देखील या धरणातील पाणी मोजण्याची कार्यवाही सिंचन विभागाकडून केली गेली नाही.

Protest For Marathwada Water News, Aurangabad
Latur : जिल्हा परिषद पुन्हा ताब्यात घेणार अन् अध्यक्ष वारकरी सांप्रदायाचा करणार..

त्यामुळे मराठवाड्याव अन्याय झाला, सिंचन क्षेत्रात देखील वाढ होऊ शकली नाही. याला जलसंपदा विभागातील तत्कालीन अधिकारी जबाबदार आहेत. जलसंपदा विभागातील रिक्त पदांमुळे मराठवाड्यातील रोजगार,उद्योग आणि संचनावर देखील परिणाम होत आहे, त्यामुळे रिक्तपदे तातडीने भरण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. मराठवाड्यात पाणी वापर संस्थेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in