Abdul Sattar : एक संधी द्या, अर्जूनाच्या बाणाने रावसाहेब दानवेंचा राजकीय वध करायचायं..

लोकसभेला शिवसेना-भाजपची युती असल्यामुळे खोतकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून माघार घेतली होती. तेव्हापासून सत्तार यांची रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्याची खूमखुमी कायम आहे. (Shivsena)
Abdul Sattar : एक संधी द्या, अर्जूनाच्या बाणाने रावसाहेब दानवेंचा राजकीय वध करायचायं..
Abdul Sattar-Raosaheb DanveSarkarnama

औरंगाबाद : शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेमकी मैत्री आहे की वैर? हेच समजत नाही. हे दोघेही एका व्यासपीठावर आले की एकमेकांची तोंडभरून स्तुती करतात. एकमेकांच्या घरी जातात, सोबत जेवण करतात. (Abdul Sattar) जालना लोकसभा मतदारसंघात सत्तारांकडून दानवेंना कशी मदत होते, आणि त्याची परफेड रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) सिल्लोड-सोयगांव मतदारसंघात कशी करतात ? याचे रंजक किस्से राजकीय वर्तुळात चांगलेच रंगवले जातात.

पण सध्या रावसाहेब दानवे आणि सत्तार यांच्यात खरंच काही बिनसलंय का? अशी शंका येऊ लागली आहे. शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या औरंगाबाद येथील स्वाभीमान सभेत अब्दुल सत्तार यांनी हजारोंच्या रावसाहेब दानवे यांचा अर्जूनाच्या बाणाने राजकीय वध करण्याची संधी द्या, अशी मागणी केली. विशेष म्हणजे तेव्हा व्यासपीठावर शिवसेनेचे नेते संजय राऊत, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मराठवाड्यातील खासदार, आमदार उपस्थितीत होते.

एकदा संधी द्या, अर्जूनाच्या बाणाने रावसाहेब दानवे यांचा राजकीय वध केला नाही, तर राजकारण करणार नाही, असे सांगायलाही ते विसरले नाही. एकंदरित सत्तार यांचा दानवे विरोध टोकाला गेला की मग ? ही त्या दोघांची मिलीभगत आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत तत्कालीन काॅंग्रेसचे आमदार व औरंगाबाद काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवेंच्या विरोधात शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांना मैदानात उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

Abdul Sattar-Raosaheb Danve
Shivsena : सुभाष देसाईंनी स्पष्टच सांगितले, औरंगाबादकरांनो पाण्यासाठी दोन वर्ष वाट पहा..

उमेदवारीसाठी सत्तार यांनी काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्याकडे गळ देखील टाकली होती. पण लोकसभेला शिवसेना-भाजपची युती असल्यामुळे खोतकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून माघार घेतली होती. तेव्हापासून सत्तार यांची रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्याची खूमखुमी कायम आहे.

आता तर सत्तार शिवसेनेत आणि राज्यमंत्री आहेत. शिवाय भाजप आणि शिवसेना यांचे फाटले असल्यामुळे येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अर्जून खोतकर यांना जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, त्यांच्या बाणाने आपण रावसाहेब दानवे यांचा राजकीय वध करू, असा दावा सत्तार यांनी जाहीर सभेत केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in