Minister Girish Mahajan Visit Affected Farm News
Minister Girish Mahajan Visit Affected Farm NewsSarkarnama

Girish Mahajan News : भूमीपूत्र म्हणून मला तुमच्या दुःखाची जाणीव, सरकार काहीही कमी पडू देणार नाही..

Marathwada : अनेक शेतकऱ्यांच्या केळी पिकाची संपूर्ण पाने फाटून गेली आहेत. अशा स्थितीत फळधारणा अशक्य आहे.

Nanded Affected Farmer : गेल्या तीन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील बारड, नागेली, पाटनूर व इतर भागात अति गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाला भेट देवून तेथील पिकांची पाहणी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली. नुकसानीबाबत मंत्रालय पातळीवरून जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले होते.

Minister Girish Mahajan Visit Affected Farm News
Sambhaji Patil Nilangekar News : शेतकऱ्यांनो तुम्ही खचू नका, केंद्रात अन् राज्यात आमचे सरकार...

ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे तात्काळ पंचनामे सुरू करून अधिकाधिक न्याय शेतकऱ्यांना कसा देता येईल हे पहावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (Nanded) बारड, नागेली, पांढरवाडी, पाटनूर येथील शेतकऱ्यांशी महाजन यांनी संवाद साधत नुकसानीची माहिती घेतली. (Affected Farmers) झालेल्या नुकसानीची एक भुमिपूत्र म्हणून मला जाणीव आहे. मी सुद्धा केळी उत्पादक शेतकरी आहे.

हाताशी आलेली केळी निसर्गाच्या अशा अवकृपेने निघून जाते तेव्हा शेतकऱ्यांना होणारे दु:ख व सोसावे लागणारे आर्थिक नुकसान याची कल्पना करवत नाही. शेतकऱ्यांसाठी शासन अधिक सकारात्मक आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्याबाबत त्यांनी सभागृहालाही वस्तुस्थिती अवगत करून हे सरकार शेतकऱ्यांना काही कमी पडू देणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

या नुकसानीबद्दल आम्ही अधिक सजग असून जिल्हा प्रशासनातर्फे तात्काळ पंचनामे पूर्ण करून मदतीबाबत कार्यवाही करू, अशी ग्वाही गिरीश महाजन यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली. निसर्गाचा लहरीपणा हा अलिकडच्या काळात वाढत चालला आहे. यात विशेषत: मार्च, एप्रिल, मे मध्ये गारपीटमुळे होणारे नुकसान आव्हानात्मक झाले आहे. वादळ, वारे, अतिवृष्टीसह विमामध्ये गारपिटीचाही समावेश करणे आवश्यक आहे.

याचबरोबर शेतकऱ्यांनीही आता विमाबाबत अधिक काळजी घेऊन गारपिटीचाही अंर्तभाव कसा होऊ शकेल याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. अनेक शेतकऱ्यांच्या केळी पिकाची संपूर्ण पाने फाटून गेली आहेत. अशा स्थितीत केळीची फळधारणा ही अशक्य आहे. एकदा केळीची पाने फाटली की हे संपूर्ण पिक हातातून गेल्यासारखे आहे. ज्याठिकाणी गारपिटीमुळे असे नुकसान झाले आहे त्यांना वास्तविक प्रत्येक झाड काढणेही आता खर्चिक आहे.

Minister Girish Mahajan Visit Affected Farm News
Hindu Jan Jagran March News : दंगा करायला नाही, हिंदूंना जागरूक करायला आलोय..

या नुकसानीचा सर्व अंदाज शासनाने लक्षात घेतला असून अधिकाअधिक मदतीची भुमिका आमच्या शासनाची असल्याचे महाजन यांनी सांगितले. पांढरवाडी शिवार येथे गोविंद चित्तलवाड यांच्या केळीचे झालेले नुकसान, कापावार शेंबोलीकर यांच्या टोमॅटोचे झालेले नुकसान तर पाटनूर शिवारातील जगदीश उपाध्याय, गोविंदराव देशमुख यांच्या शेतातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली. नांदेड जिल्ह्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या १९ हजार ८९९ एवढी असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

यात जिरायत बाधित क्षेत्र ११ हजार ३७६ हेक्टर असून बागायत बाधीत क्षेत्र हे १० हजार ६३६ असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे १ हजार ५४२ हेक्टर क्षेत्रावरील फळपिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अर्धापूर, भोकर, मुदखेड, नांदेड, लोहा, हदगाव, देगलूर, हिमायतनगर, कंधार, किनवट आदी तालुक्यांचा यात समावेश आहे. या गारपिटीमुळे ९१७ शेतकरी बाधित आहेत.

Minister Girish Mahajan Visit Affected Farm News
Hindu Jan Garjana March News : `जो हिंदू हित की बात करेगा`, सहकार मंत्र्यांच्या मोर्चात घोषणा..

सद्यस्थितीत एकुण ६९८ हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे झालेले आहेत. उरलेले पंचनामे येत्या ४ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश गिरीश महाजन यांनी आढावा बैठकीत दिले. दरम्यान, माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना अधिकाधिक न्याय मिळावा यादृष्टीने शासनाने प्रयत्न करावेत. याचबरोबर विमाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर जमा व्हावी यासाठी विमा कंपन्यांना निर्देश देण्याची मागणी करत महाजन यांना लेखी निवेदन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com