Girish Mahajan At Dhule : अवकाळी पावसाने शेतपिकांचे नुकसान; गिरीश महाजन शेतकऱ्यांच्या बांधावर..

राज्याला ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

Girish Mahajan At Dhule : राज्याला ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. राज्यातील विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठं नुकसान झालं आहे. धुळे जिल्ह्याला तर गारपिटीने शेतपिके झोपली आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश दिल्यानंतर आता धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत.

गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी साक्री (Sakri) तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. साक्री तालुक्‍यात सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे कांदा, सोयाबीन, गहू पिंकांसह पपई, आंबा या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली आहे. तसेच त्यांनीही पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत.

Girish Mahajan
Shambhuraj Desai : तर जीभ हासडून टाकू...; कोकणातील सभेनंतर शंभूराज देसाईंचा ठाकरेंना थेट इशारा!

पीक नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई (Dhule News) मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना त्यांच्यासोबत आमदार मंजुळा गावित, खासदार सुभाष भामरे व आमदार जयकुमार रावल, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.

गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा पिकांसह भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी आपण तातडीने या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलो आहोत. असे महाजन यांनी सांगितले. सध्या विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल. नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची भूमिका निभावली आहे. मध्यंतरीच्या काळात यात खंड पडला, पण आता असे होणार नाही, असं आश्वासही महाजन यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in