Gangapur Sugar Factory : गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर गंगापूर कारखान्यात पूजा, लवकरच होणार सुरू..

Marathwada : गंगापूर कारखाना जयहिंद शुगरला २५ वर्षांच्या भाडेतत्वावर चालवण्यासाठी देण्यात आला आहे.
Gangapur Sugar Factory News
Gangapur Sugar Factory NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : गेल्या पंधरा वर्षापासून बंद असलेल्या गंगापूर सहकारी कारखान्यात आज गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर विधिवत पूजा करण्यात आली. जयहिंद शुगरच्या अध्यक्षा सुष्मिता विखे पाटील, गंगापूर कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर (Krishnapatil Dongaonkar) यांच्यासह संचालक मंडळ, सभासद शेतकरी आणि नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Gangapur Sugar Factory News
Gudhi padva News : `आनंदाचा शिधा`, आला पण निम्माच, त्यातही तेल गायब..

नवे संचालक मंडळ निवडून आल्यानंतर गुडीपाडव्याला कारखाना सुरू करणार असे आश्वासन चेअरमन डोणगांवकर यांनी दिले होते. (Shivsena) दोन दिवसांपुर्वी सोलापूरच्या जयहिंद शुगर आणि राज्य सहकारी बॅंकेत करार झाला आणि आज कारखान्यात पूजा घालत कामाला प्रारंभ करण्यात आला. (Marathwada) या गळीत हंगामापासून कारखाना सुरू करण्यात येणार आहे.

गंगापूर कारखाना जयहिंद शुगरला २५ वर्षांच्या भाडेतत्वावर चालवण्यासाठी देण्यात आला आहे. आज गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कारखान्याच्या कामाचा शुभारंभ करतांना विधिवत पूजा जय हिंद शुगर गंगापूर युनिटच्या अध्यक्षा सुष्मिता विखे पाटील, गणेश माने देशमुख, अध्यक्ष जय हिंद शुगर आचेगाव युनिट सोलापूर तसेच त्यांचे चिरंजीव जयवर्धन यांच्या शुभ हस्ते पार पडली.

यावेळी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे सभासद, कामगार शेतकरी, कर्मचारी, संचालक मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असलेला गंगापूर सहकारी साखर कारखाना २५ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर चालू करण्याबाबतचा राज्य बँक व जयहिंद शुगर सोलापूर यांच्यातील करार २० मार्च रोजी झाला. त्यामुळे यावर्षी कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बंद असलेल्या कारखाना सुरू करण्याबाबत राज्य सहकारी बँकेने मागील सात-आठ महिन्यांपूर्वी निविदा काढल्या होत्या. त्यामध्ये सोलापूरच्या जयहिंद शुगरला कारखाना देण्याबाबत बँकेने सहमती दर्शवली होती. परंतु काही कारणाने कारखाना चालवण्याबाबतचा करार होत नसल्याने विलंब होत होता. मागील महिन्यातच गंगापूर सहकारी साखर कारखान्याची सार्वत्रिक निवडणुक पार पडली. यात कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या शिवशाही पॅनलचे २० संचालक मोठ्या फरकाने विजयी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com