Gangapur APMC Result News : भाजप आमदार बंब यांनी मतदारसंघातील दोन्ही बाजार समित्या जिंकल्या..

Bjp : कृष्णा पाटील डोणगावकर, राष्ट्रवादीतून नुकतेच बीआरएसमध्ये प्रवेश केलेले संतोष माने यांना मर्यादित यश मिळाले.
Gangapur APMC Result News
Gangapur APMC Result News Sarkarnama

Market Committee : गंगापूर सहकारी साखर कारखान्यात दारूण पराभव झाल्यानंतर भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्यासाठी गंगापूर आणि लासूर बाजार समितीत (Gangapur APMC Result News) विजय मिळवणे प्रतिष्ठेचे बनले होते. कारखान्यातील पराभवानंतर त्यांच्या विधानसभेत करेक्ट कार्यक्रम होणार अशा वल्गना विरोधकांकडून केल्या जात होत्या.

Gangapur APMC Result News
Nilanga APMC Result News : निलंगेकरांकडून परफेक्ट नियोजन अन् करेक्ट कार्यक्रम..

मात्र आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी लासूर आणि गंगापूर या दोन्ही बाजार समित्यांमध्ये शिंदे गटालासोबत घेत विजय मिळवला. लासूरमध्ये १८ पैकी १६ जागा जिंकत बाजार समिती ताब्यात घेतली. (Bjp) तर गंगापूरमध्ये त्यांना १८ पैकी १३ जागा जिंकता आल्या. तर ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या पॅनलला ५ जागांवर समाधान मानावे लागले.

बंब यांचे हे कमबॅक असल्याचे बोलले जात आहे. वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्या मतदतीने बंब यांनी लासूरमध्ये मोठा विजय मिळवला. तर गंगापूरमध्ये ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर, राष्ट्रवादीतून नुकतेच बीआरएसमध्ये प्रवेश केलेले संतोष माने यांना मर्यादित यश मिळाले. या निवडणुकीचे दुरगमी परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद व आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येतील असे देखील बोलले जाते.

गंगापूर बाजार समितीत भाजप-शिंदे गटातून सोसायटी मतदारसंघात रामेश्वर गवळी, भाऊसाहेब पदार, भारत पाटील, उमेश बारहाते, अर्चना सुकासे, सतीश डेडवाल, ताराचंद दुबिले हे विजयी झाले. तर राष्ट्रवादी-शिवसेना ठाकरे गटाचे ज्ञानेश्वर नीळ, सुवर्णा जाधव, नारायण बारहाते, दिपक जाधव हे विजयी झाले आहेत.

ग्रामपंचयात मतदारसंघातील चारही जागा भाजप-शिंदे गटाने जिंकल्या. दिपक बडे, सुशीलाबाई राजगिरे, सचिन काकडे, नवनाथ सुरासे यांचा त्यात समावेश आहे. तर हमाल मापारी मतदारसंघातून राष्ट्रवादी-ठाकरे गटाचे पठाण तौफिक उस्मान यांचा विजय झाला. व्यापारी मतदारसंघात भाजप-शिंदे गटाचे अप्पासाहेब हिवाळे, शेख जफर ईस्माईल, तर ठाकरे गटाकडून लक्ष्मण सांगळे व भाजप-शिंदे गटाचे ताराचंद दुबिले यांना समान मते मिळाली. ईश्वर चिठ्ठीवर दुबिले यांना विजय घोषित करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com