मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे 'चला हवा येऊद्याचा प्रयोग' ; मनसेचा हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट अबु आझमींकडून आलेली की काय याची शंका आहे.
मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे 'चला हवा येऊद्याचा प्रयोग' ; मनसेचा हल्लाबोल
Manse Gajanan Kale, MNS News, Manse News Updates, Uddhav Thackeray Aurangabad Rally Newssarkarnama

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी काल एक तास भाषण केलं. या भाषणात त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या भाषणानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट करीत त्यांच्या भाषणाची खिल्ली उडवली. त्यानंतर आता मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर टीका केली आहे.(Uddhav Thackeray Aurangabad Rally News)

गजानन काळे यांनी टि्वट करीत ठाकरेंच्या भाषणावर निशाणा साधला आहे. काळे म्हणाले, " मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट अबु आझमींकडून आलेली की काय याची शंका आहे, मुख्यमंत्र्यांची आजची सभा म्हणजे चला हवा येऊद्याचा प्रयोग,"

काळे म्हणाले,"मुख्यमंत्र्यांच्या टोमणे सभेचा दुसरा अंक गोंधळलेल्या भाषणाने झाला.आम्हाला वाटलेलं टोमणे सभेची स्क्रिप्ट बारामतीवरुन येईल. पण आम्ही चुकलो, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट अबु आझमींकडून आलेली की काय याची शंका आहे, संभाजीनगरच्या नावावरून मुख्यमंत्र्यांनी सभेत ब्र देखील काढला नाही. संभाजीनगर होणार की नाही याचं उत्तर शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहिलं,"

Manse Gajanan Kale, MNS News, Manse News Updates, Uddhav Thackeray Aurangabad Rally News
फाटक्या कपड्यातला शिवसैनिकानं वेधलं लक्ष ; ठाकरे मुख्यमंत्री व्हावे, म्हणून सहा कोटी वेळा जप

"ना हिंदुंच्या विषयावर बोलले ना विकासाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलले.औरंगजेबाच्या थडग्याबद्दल , भोंग्यांबद्दल, नमाजबद्दल मुख्यमंत्री ब्र देखील काढत नाहीत. ३ दशकांपासून नगरसेवक, आमदार, खासदार संभाजीनगरला सेनेचा असूनही पाणी प्रश्न सोडवता आला नाही. एकाही प्रश्नावर मुख्यमंत्री स्पष्ट बोलू शकले नाहीत," अशी टीका गजानन काळेंनी मुख्यमंत्र्यावर केली आहे.

Manse Gajanan Kale, MNS News, Manse News Updates, Uddhav Thackeray Aurangabad Rally News
Gang Rape : एमआयएम आमदाराच्या मुलाला अटक, गुन्हा घडला ती सरकारी कार

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला देवेंद्र फडणवीस यांनी केवळ २ ट्वीटमधून उत्तर दिले. ते म्हणाले, बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही, पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही, त्यांनी दुसर्‍यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि...! माझे पुन्हा सवाल आहेत, शेतकर्‍यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?असो, संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना... काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे!, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in