सर्वांगीण विकासासाठी निलंगेकरांच्या पाठीशी रहा : गहिनीनाथ महाराज औसेकर

दहा टक्के राजकारण आणि नव्वद टक्के समाजकारण करत ते जनतेच्या विश्वासास पात्र ठरले असल्याचे औसेकर महाराज म्हणाले.
 Sambhaji Nilangekar & Gahininath Maharaj Ausekar
Sambhaji Nilangekar & Gahininath Maharaj AusekarSarkarnama

निलंगा : निलंग्यात (Nilanga) माजी मंत्री व आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Nilangekar) यानी महामार्ग व रेल्वेच्या माध्यमातून विकासाची गंगा आणली असून जिल्ह्याच्या संर्वांगीण विकासासाठी त्यांच्या पाठीशी राहावे, असे भावनिक आवाहन पंढरपूर (Pandharpur) देवस्थान समितीचे उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यानी शनिवारी (ता. 13 नोव्हेंबर) केले. ते निलंगा शहरातील गुरूबाबा महाराज संस्कृतीक सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते.

 Sambhaji Nilangekar & Gahininath Maharaj Ausekar
अबब! दिल्ली बनले जगातील सर्वात प्रदूषित शहर

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाथ संस्थानचे गुरूबाबा महाराज औसेकर होते. तर, यावेळी संभाजी निलंगेकर, खासदार सुधाकर शृंगारे, भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, नगरध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगरध्यक्ष मनोज कोळ्ळे, पंचायत समिती सभापती राधा बिराजदार आदी उपस्थित होते.

औसेकर महाराज म्हणाले की, राजकारणात अनेकांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केला असला तरी निलंगेकरांनी निलंग्यात संस्कृतीक व सांप्रदायीक वातावरण टीकवत या मातीला गालबोट लागणार नाही ही काळजी घेत, या पावन भूमीचे पावित्र्य टीकवण्याचे काम निलंगेकरानीच केले आहे. 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' या अभंगाप्रमाणे त्यानी निलंगा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला असून, राजकारणात दहा टक्के राजकारण आणि नव्वद टक्के समाजकारण करत ते जनतेच्या विश्वासास पात्र ठरले आहेत. म्हणूनच त्यांना लाभलेला सामान्यांचा आशीर्वाद हिच खरी त्यांनी निर्माण केलेली मोठी संपत्ती व ओळख असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 Sambhaji Nilangekar & Gahininath Maharaj Ausekar
मोठी बातमी : एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरांप्रमाणे वेतनास सरकार सकारात्मक

यावेळी निलंगेकर म्हणाले की, शहरातील विकास कामे ही सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यासमोर असून जनसामान्यांची सेवा करण्याची संधी या कामाच्या माध्यमातून मला मिळाली आहे. एखाद्याच्या जवळ लाखो रूपये असले तरी, विकास कामासाठी देण्यासाठी इच्छाशक्ती नसेल, तर कुठलेच काम होत नाही. येथील लाखों लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मी विकास साधू शकलो. ही संप्रदायाची परंपरा आपण असेच पुढे चालू ठेवणार असून राष्ट्रीय स्तरावर भविष्यात लातूर येथे वारकरी राष्ट्रीय स्पर्धेचे अयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सुधाकर शृंगारे म्हणाले, विकासकामासाठी निधी आणण्याचे काम निलंगेकरच करू शकतात हे त्यांनी दाखवून दिले असून ते त्यांना कसे जमते मी स्वता अचंबित झालो आहे. सातत्याने विकासनिधी आणण्यासाठी दुरदृष्टी लागते ती दुरदृष्टी त्यांच्याकडे आहे. महामार्ग व रेल्वे प्रश्न मार्गी लावून जिल्ह्याला देशाच्या नकाशावर निलंगेकर यानी झळकविले आहे.

अध्यक्षीय समारोपात गुरूबाबा महाराज म्हणाले, धर्माचे व जनतेचे पालन करणारे संभाजी म्हणजे निलंगेकर आहेत. प्रजेचे हित करणाऱ्यालाच राजा म्हणतात. त्याप्रमाणे लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांच्या अडचणीत धावून जाणारे व सर्वांगीण विकास करणाऱ्यालाच खासदारकी व आमदारकी मिळत असते. म्हणून आपण पुण्यवान आहात आपल्या निलंगेकर घराण्याचा नावलौकिक देश व राज्यपातळीवर केलल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक शाम कुलकर्णी तर सुत्रसंचलन व आभार सतीश हानेगावे यानी मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com