गडकरींनी आमदार विनायक मेटेंच्या पाच पैकी चार मागण्या केल्या मान्य

(Central Minister Nitin Gadkari)विविध महामार्ग व रस्ते कामांना मंजूरी व निधी उपलब्धतेसाठी विनायक मेटे (Mla Vinayak Mete) यांनी रविवारी नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली.
गडकरींनी आमदार विनायक मेटेंच्या पाच पैकी चार मागण्या केल्या मान्य
Mla Vinyak Mete with Minister GadkariSarkarnama

बीड : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची रविवारी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी नागपूरला भेट घेतली. विविध पाच कामांना मंजूरीसाठी पत्र त्यांनी गडकरींकडे सोपविली. त्यावर नजर टाकत गडकरींनी पाच पैकी चार कामे मार्गी लावतो, असा शब्द मेटेंना दिला.

विविध महामार्ग व रस्ते कामांना मंजूरी व निधी उपलब्धतेसाठी विनायक मेटे यांनी रविवारी नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली. दोघांमध्ये दिर्घकाळ चर्चाही झाली. यावेळी विनायक मेटे यांनी पाच कामांना मंजूरी व निधी मागणीचे पत्र गडकरींच्या हाती सोपविले. सर्व मागण्या वाचल्यानंतर गडकरी यांनी यातील चार कामे मार्गी लावतो असा, शब्द दिला.

मेटे यांनी खर्डा - चौसाळा - साळेगाव - अंबाजोगाई - परळी या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जोन्नती करावी, बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीवर पुल कम बंधारा मंजूर करावा, धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड बाह्यवळण रस्त्याला स्लीप रोड बांधावेत व म्हाळजवळा - जरूड - बोरफडी - येळंब - चौसाळा हा प्रमुख जिल्हा मार्ग केंद्रीय मार्ग निधीतून मंजूर करावा, अशा पाच मागण्या केल्या.

शहरातील बिंदुसरा नदीवर एक पुल व एक पुल कम बंधरा बांधावा, अशा सुचना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी दिल्या होत्या. मात्र, एका पुलाचे बांधकाम होऊन तीन वर्षे लोटले मात्र पुल कम बंधारा अद्याप अपूर्ण असल्याचे त्यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले.

Mla Vinyak Mete with Minister Gadkari
उद्याचा महाराष्ट्र बंद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असता तर कौतुक केले असते ; भाजपचा टोला

Related Stories

No stories found.