
Smriti Irani : आपला देश आता डिजिटल इंडिया म्हणून ओळखला जात असून, या नव्या बदललेल्या भारताची चावी महिलांच्या हाती आहे, असे मत केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी व्यक्त केले. महिला-२० परिषदेत होणारे विचार मंथन जगाला पुढे नेणारे ठरेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महिला-२० परिषदेचे उद्घाटन सोमवारी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे इराणी यांच्या हस्ते झाले. स्मृती इराणी म्हणाल्या, (Women)महिला-२० परिषदेची सुरवात महाराष्ट्रातून होत आहे. महाराष्ट्रात मराठा साम्राज्य होते. (Bjp) मराठा साम्राज्याची ओळख राजमाता जिजाऊ यांच्यामुळे होते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या या परिषदेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
या परिषदेत तळागाळातील महिला नेतृत्व, डिजिटल लैंगिक समानता, शिक्षण आणि कौशल्य विकास आणि हवामान बदलावरच्या उपाययोजनेवर कृती समूहात महिला आणि मुलींचा परिवर्तनकर्त्या म्हणून समावेश, असे पाच प्राधान्यक्रम ठरवण्यात आले आहेत. भारतात सहा लाख २२ हजार खेडे आहेत. त्यात आठ कोटी पेक्षा जास्त महिला या शेती व्यवसायाशी निगडित आहेत. मात्र त्यांनी देखील आता डिजिटल इंडियाची कास धरली आहे.
सध्या देशात आरोग्य, उद्योग, शिक्षण आशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम सुरु आहे. भारत हा महिला सक्षमीकरणासाठी अग्रेसर आहे. जगात ३० लाखापेक्षा अधिक महिला या सक्रिय राजकारणात आहेत. त्यापैकी १४ लाख महिला या भारतात आहेत. दोन कोटी ३० लाख महिलांनी मुद्रा लोनचा लाभ घेत स्व:चा उद्योग सुरु केला.
या परिषदेत जगभरातून आलेल्या महिलांच्या विचारातून देशाच्या प्रगतीसाठी अनेक मुद्दे मिळतील, अशी अपेक्षा ही स्मृती इराणी व्यक्त केली. महिलांचे सबलीकरण करताना पुरुषांनाही सोबत घेतले पाहिजे, असे आवाहन स्मृती इराणी यांनी केले. यासंदर्भातील किस्सा सांगताना त्या म्हणाल्या, मी शहरात आले तेव्हा स्वागत करण्यासाठी महिलांची गर्दी होती. सगळीकडे महिलांचा वावर होता. पण पुरुष एका बाजूला उभे होते.
तेव्हा मी पुरुषांना पण सुद्धा सोबत घ्या, असे सांगितले. त्यांना वेगळे ठेवल्याचे दु:ख काय आहे. हे महिलांशिवाय कोणाला कळणार नाही, असे म्हणत स्मृती इराणी यांनी उपस्थितांना चिमटा काढला. व्यासपीठावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, जी-२० परिषदेचे शेरपा अमिताभ कांत, महिला-२० परिषदेच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, डॉ. गुल्डेन तुर्कतन, सहकारमंत्री अतुल सावे, पालकमंत्री संदीपान भुमरे, समन्वयक धरित्री पटनायक, आमदार हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.