G-20 News : रेड कार्पेट, फुलांच्या उधळणीत विदेशी पाहुण्यांची लेणी व मकबऱ्याला भेट..

Women's Summit : हा प्राचीन वारसा पहिल्यानंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले.
G-20 News, Chhatrapati Sambhajinagar
G-20 News, Chhatrapati SambhajinagarSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : जी-२० परिषदेच्या शिष्टमंडळाने आज शहरातील प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या औरंगाबाद लेणी आणि बीबीका मकबऱ्याला (Bibi ka Makbara) भेट दिली. शिष्टमंडळात असणाऱ्या सर्व विदेशी महिला पाहुण्या हा वारसा पाहून अक्षरशः भारावून गेल्या. शिष्टमंडळ औरंगाबाद लेणीला भेट देणार असल्यामुळे परिसर सुशोभित करण्यात आला होता. लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने रांगोळी काढल्यामुळे रस्त्याचे सौंदर्य खुलले होते.

G-20 News, Chhatrapati Sambhajinagar
Maharashtra Budget Session: डोक्यावर टोपली अन् गळ्यात कांद्याची माळ ; विरोधकांचे अनोखं आंदोलन, पाहा फोटो!

तीन वातानुकूलित बसेसमधून सकाळीच लेणीच्या पायथ्याशी महिला पाहुण्यांचे आगमन झाले.(G-20) नऊवारी नेसलेल्या तरुणींनी त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांना गुलाब पुष्प भेट दिले. (Aurangabad Caves) लेणीपर्यंत जाण्यासाठी लाल कार्पेट अंथरण्यात आले होते.

पुरातत्व विभाग, जिल्हा व महानगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही त्यांचे स्वागत केले. मुख्य लेणीच्या परिसरात आल्यानंतर लेणीचे सौंदर्य पाहून सर्व महिला थक्क झाल्या. यावेळी उपस्थित गाईडने प्राचीन लेणीच्या प्रत्येक भागाची माहिती पाहुण्यांना दिली. हा प्राचीन वारसा पहिल्यानंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले.

औरंगाबादच्या लेण्यांचा समूह हा आसपासच्या जमिनीपासून ७० फूट उंचीवर असलेल्या दख्खन पठारामध्ये कोरलेल्या आहेत. येथे बौध्द धर्माला समर्पित एकूण १२ लेणी आहेत ज्या तीन स्वतंत्र गटामध्ये विभाजित आहेत. पहिल्या गटात १ ते ५ पर्यंत दुसऱ्या गटात ६ ते ९ आणि तिसऱ्या गटात १० ते १२ लेणी आहेत.

या लेण्या सुमारे तिसऱ्या ते सातव्या शतकात निर्माण केलेल्या आहेत. औरंगाबाद लेणी पहिल्यानंतर शिष्टमंडळाने जवळच असणाऱ्या बीबी का मकबऱ्याला भेट दिली. या ठिकाणी त्यांचे स्वागत तुतारी व सनई चौघडयाने करण्यात आले. शहराच्या सौंदर्यात भर घालणारा बीबी का मकबरा पाहताना पाहुण्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com