G-20 News : `जी` परिषद की बी (जेपी) परिषद ; निमंत्रितांमध्ये नेते, पदाधिकाऱ्यांचाच भरणा..

Chhatrapati Sambhajinagar : २०१४ नंतर देशाचे चित्रच बदलत आहे, त्याविषयी आम्ही चांगलेच सांगणार!
G-20 News, Chhatrapati Sambhajinagar
G-20 News, Chhatrapati SambhajinagarSarkarnama

Bjp : जगातील २० देशांनी एकत्रित येऊन जी-२० परिषद (G-20 Summit) स्थापन केली आहे. यात राजकीय हस्तक्षेप नसल्याचे वारंवार सांगितले जाते, पण निमंत्रितांची यादी पाहिली तर भाजप पदाधिकारी किंवा संघटनेशी संबंधित असलेल्यांचा भरणाच अधिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या परिषदेच्या नावाखाली भाजपचा अजेंडा राबविला जात असल्याचा आरोप होत आहे.

G-20 News, Chhatrapati Sambhajinagar
Imtiaz Jalil News : बाळासाहेब ठाकरेंना राजकीय दुकान चालवायचे होते, म्हणून शहराचे नाव बदलले..

निमंत्रितांमध्ये राज्यसभेच्या खासदार डॉ. सोनल मानसिंग, गुजरातमधील दूध उत्पादक सहकारी फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक जयेन्त मेहता, प्रधानमंत्री कार्यालयातील आर्थिक सल्लागार प्रो. शमिका रवी, पश्चिम बंगालमधील (Bjp) भाजपच्या प्रदेशाध्यक्षा व राष्ट्रीय प्रवक्त्या भारती घोष, (Gujrat) गुजरातमधील वलसाड जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या सुधाबेन पटेल, महिला-२० परिषदेच्या मुख्य समन्वयक व हमारा बचपन ट्रस्टच्या धारित्री पटनायक.

तसेच भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या अ‍ॅड. बान्सुरी स्वराज, श्री श्री विद्यापीठाच्या अध्यक्षा डॉ. राजिता कुलकर्णी, डॉ. गायत्री वसुदेवन, जम्मू-काश्मीरच्या इंदू कोमल यांच्यासह अनेक महिलांचा यात समावेश आहे. महिला-२० परिषदेपूर्वी व सांगता झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत आल्यानंतरच म्हणजेच २०१४ नंतर देशात महिलांच्या सक्षमीकरणासाठी ध्येय धोरणे राबविण्यास प्रारंभ झाला, असे ठासून सांगण्यात आले.

पंतप्रधान महिलांच्या धोरणाबद्दल कसे जागरूक आहेत, नारी शक्तीला प्रोत्साहन देत आहेत, `वसुधैव कुटुम्बकम` या प्रमाणे वागत असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर ॲड. बान्सुरी स्वराज म्हणाल्या की, या परिषदा राजकारणविरहित आहेत. पण पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने काम करतात, २०१४ नंतर देशाचे चित्रच बदलत आहे, त्याविषयी आम्ही चांगलेच सांगणार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in