Aurangabad : केंद्राच्या `अमृत`साठी महापालिका १ हजार कोटी कुठून आणणार ?

केंद्र व राज्य शासन महापालिकेने स्वहिस्सा टाकल्याशिवाय निधीही देत नाही. त्यामुळे या प्रकल्पांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. (Aurangabad Municipal Corporation)
Aurangabad Municipal Corporation News
Aurangabad Municipal Corporation NewsSarkarnama

औरंगाबाद : महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेत समावेश होत आहे. आतापर्यंत तीन प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्राकडे गेले आहेत. मात्र, प्रकल्पांसाठी स्वहिस्सा म्हणून महापालिकेला तब्बल एक हजार कोटी रुपये टाकावे लागणार आहेत. हा निधी कुठून आणायचा याची चिंता प्रशासनाला पडली असून, त्यासाठी राज्य शासनाला साकडे घातले जात आहे.

Aurangabad Municipal Corporation News
Prakash Ambedkar : जाती व्यवस्था मोडल्याशिवाय भारत जोडणे अशक्य..

राज्य शासनाने शहरासाठी मंजूर केलेल्या १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा समावेश केंद्र शासनाच्या अमृत-२ मध्ये करण्यात आल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. (Municipal Corporation) प्रकल्पासाठी लागणाऱ्या स्टीलसह इतर किमतीमध्ये वाढ झाल्याने अमृतमध्ये जाताना ही योजना २७१४ कोटी २० लाख रुपयांवर गेली आहे. (Aurangabad) केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रकल्पाच्या एकूण किमतीच्या तीस टक्के रक्कम महापालिकेला द्यावी लागणार आहे.

म्हणजे सुमारे साडेआठशे कोटी रुपये महापालिकेला पाणी योजनेसाठी स्वहिस्सा म्हणून द्यावे लागतील. महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता एवढी रक्कम कशी भरणार अशी चिंता प्रशासनापुढे आहे. त्यामुळे या निधीचा भार राज्य शासनाने उचलावा म्हणून पत्रव्यवहार सुरू आहेत. पाणी योजनेसोबतच कमल तलावाचे पुनरुज्जीवन-सुशोभीकरण व सातारा-देवळाईसाठीचा ड्रेनेजलाइनचा प्रकल्प अमृत-२ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

कमल तलावाच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटी ८० लाख तर सातारा-देवळाईचा ड्रेनेजलाइनचा प्रकल्प २७५ कोटींचा आहे. या दोन्हीही प्रकल्पांसाठीची प्रत्येकी तीस टक्के रक्कम स्वहिस्सा म्हणून महापालिकेला द्यावी लागणार आहे. या तिन्हीही प्रकल्पांसाठी मिळून महापालिकेला किमान एक हजार कोटी रुपये म्हणून द्यावे लागतील. एवढी मोठी रक्कम कशी उभारायची? असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.

केंद्र व राज्य शासन महापालिकेने स्वहिस्सा टाकल्याशिवाय निधीही देत नाही. त्यामुळे या प्रकल्पांच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. पाणीपुरवठा योजना शहरासाठी अत्यावश्‍यक असून, महापालिकेच्या हिश्‍शाचा निधी राज्य शासनाने द्यावा, असा प्रस्ताव प्रशासनाने पाठविला आहे. यासंदर्भात वारंवार चर्चादेखील झाली; पण राज्याकडून अद्याप कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही. उलट महापालिका योजनेत स्वहिस्सा भरेल, अशी हमी राज्य शासनाने घेतलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in