चारशे शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू; न्याय द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांना फिरू देणार नाही

(Guardian Minaister Amit Deshmukh)शेतकऱ्यांची आज जी काही दयनीय अवस्था झाली आहे, त्याला पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप देखील( Bjp Mla Ninangekar) निलंगेकर यांनी केला.
Cm Thackearay-Bjp Mla Nilangekar
Cm Thackearay-Bjp Mla NilangekarSarakarnama

लातूर ः अतिवृष्टी आणि पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, या मागणीसाठी जिल्ह्यातील चारशे शेतकऱ्यांनी आजपासून ७२ तासांचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले. लातूरच्या शिवाजी चौकात सुरू झालले हे आंदोलन १३ आॅक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. शेतकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा भाजपचे आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी दिला.

अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नूकसान झाले. शेती खरडून गेली, घरदार, पशूधन वाहून गेले. पण राज्यातील आघाडी सरकारकडून अद्याप एका रुपयाचीही मदत झाली नाही. या निषेधार्थ आजपासून शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाला भाजपसह विविध संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला. आमदार संभाजी पाटील निलंगेककर यांनी यावेळी, पालकमंत्री अमित देशमुख यांच्यासह राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

संभाजी पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीला पाकमंत्री अमित देशमुख हेच जबादार आहे. राज्याला साडेतीनशे कोटी मिळाले, पण यातील एक रूपया देखील जिल्ह्याला आणता आला नाही. लातूरकर संकटात असले की हे नेहमी मुंबईत असतात. आता देखील हवाई पाहणी करून गेले. शेतकऱ्यांची आज जी काही दयनीय अवस्था झाली आहे, त्याला पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला.

शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही गांधीजींच्या मार्गाने अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यानंतरही उद्धव ठाकरे सरकारचे डोळे उघडले नाही, तर सुभाषचंद्र बोस यांच्या मार्ग देखील आम्हाला अवलंबता येतो. आज सोयाबीनच्या पेंड्या घेऊन बसलो आहोत, उद्या हातात काठ्या आणि ऊसाचे टिपरू घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील पाटील यांनी यावेळी दिला.

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले, आणि लखीमपुरच्या घटनेसाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या सरकारला लाज वाटायला पाहिजे. लखीमपुरची घटना आणि यातील आरोपींना शासन करण्यास योगी सरकार भक्कम आहे. बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर करणाऱ्या योगी सरकारला कुणी शिकवण्याची गरज नाही. पण महाराष्ट्रातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केले? त्यांच्यासाठी कधी बंद पुकारणार?असा सवाल देखील निलंगेकर यांनी उपस्थित केला.

Cm Thackearay-Bjp Mla Nilangekar
जो शेतकऱ्यांना आडवा येईल, त्याला तुडवा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in