उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अपशकुन नको म्हणून शांत होतो: रविंद्र गायकवाड

Shivsena| Eknath Shinde Group| कामासाठी सत्ता महत्वाची असते.
Ravindra Gaikwad
Ravindra Gaikwad

उमरगा : महाविकास आघाडी सरकार हे जनतेच्या मनातील सरकार नाही हे मी स्पष्ट बोललो होतो. परंतु उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाल्यानंतर अपशकुन नको म्हणून इतके दिवस शांत होतो. अशा शब्दात माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी शिंदे गटासोबत जाण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी बंड केल्यानंतर कडवट प्रतिक्रिया देणारे माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी आठ दिवसापूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट केली. शहरातील श्री मंगल कार्यालयात आयोजित उमरगा व लोहारा तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत गायकवाड यांनी भूमिका स्पष्ट केली. आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड, बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, मोहयोद्दीन सुलतान यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी बोलताना प्रा. गायकवाड यांनी महाविकास आघाडी सरकार हे जनतेच्या मनातील सरकार नव्हतेच.याबाबत मी त्यावेळीही नाराजी व्यक्त केली होती. परंतु पक्षप्रमुख उध्दव ठाकरे  मुख्यमंत्री झाल्याने अपशकुन होऊ नये म्हणून मी शांत राहिलो. परंतु चांगले मुख्यमंत्री असूनही त्यांचे आजारपण व आमदारांवर होणारा अन्याय यामुळे बंडखोरीचा स्फोट झाला.

Ravindra Gaikwad
Congress President : कॉंग्रेसच्या पाच खासदारांचा 'लेटर बॅाम्ब' : निवडणुकीबाबत चिंता

मतदारसंघातील कामांना प्राधान्य देण्यासाठीच लोक लोकप्रतिनिधीना निवडून देत असतात. गणपती विसर्जनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल व त्यांनतरच खऱ्या अर्थाने विकासमांना गती येईल. शिवसेना भवन व मातोश्रीवर गाऱ्हाणे ऐकून घेणारे कोणीच नाही मग जनतेची कामे कोणाकडे घेऊन जायची. कामासाठी सत्ता महत्वाची असते. शिंदे सरकारच्या काळात मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी पदरात पाडून घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करत विकासभीमुख राजकारणासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे गायकवाड म्हणाले.

युवा नेते किरण गायकवाड म्हणाले, रवी सर हे बाळासाहेबांचे चाहते होते, त्यांनी सुरुवातीपासूनच सामाजिक बांधिलकी जपली. आमदार निधी काय असतो हे सर्वप्रथम तालुक्यातील जनतेला सर्वप्रथम रवी सरांमुळेच समजले.

२००९ मध्ये विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर रवि सरांनी ज्ञानराज चौगुले यांना पूढे आणले. तेही त्यांच्या परीने चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. कोरोना काळात आपण केलेले काम हे जनतेच्या मनात आहे. गोरगरिबांच्या कामांसाठी आपण सदैव तत्पर राहू. येणारी निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडून आणण्यांची आपणा सर्वांची जबाबदारी आहे.

आमदार  चौगुले यांनी मागील तेरा वर्षांच्या काळात मतदारसंघाच्या विकासासाठी भरघोस निधी आणून सर्वसामान्य जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले.तर सर्व निवडणुकांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ दिल्याचे सांगत राजकीय गुरू प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा मी आजवर प्रयत्न केला आहे यापुढेही करेन, असा विश्वास आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in