शिवसेनेचे माजीमंत्री अर्जुन खोतकरांची ईडीकडून बारा तास चौकशी

ईडीकडून (ED) अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली. अनेक कागदपत्रे, खोतकर बिजनेस सेंटरसह, रामनगर साखर कारखान्याच्या व्यवहाराची चौकशी ईडीने केली
शिवसेनेचे माजीमंत्री अर्जुन खोतकरांची ईडीकडून बारा तास चौकशी
Arjun Khotkarsarkarnama

जालना : शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar)यांच्या जालना येथील निवासस्थानी आणि त्यांच्याशी संबंधित जालना कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने शुक्रवारी छापे टाकले.

जालना सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहारात कोटय़वधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अलीकडेच खोतकर यांना लक्ष्य केले होते. ईडीकडून (ED) अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली.

अनेक कागदपत्रे, खोतकर बिजनेस सेंटरसह, रामनगर साखर कारखान्याच्या व्यवहाराची चौकशी ईडीने केली. ईडीच्या पथकाकडून रात्री उशिरा दोनपर्यंत ही चौकशी करण्यात आली. त्यानंतर खोतकर यांची चौकशी संपली, आणि ईडीचं पथक औरंगाबादकडे रवाना झाले.

Arjun Khotkar
संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील नव्या विधेयकावर आक्षेप

ईडीकडून खोतकर यांची सलग बास तास चौकशी करण्यात आली. तब्बल बारा तासाच्या या चौकशीत ईडीच्या हाती काय लागले हे ईडीच्या अहवालानंतरचं समोर येणार आहे.ईडीच्या बारा सदस्य असलेले ईडीच्या चार पथकाकडून जालन्यात ही चौकशी करण्यात आली.

पथकाकडून अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांच्या कृषी उत्पन्न बाजर समितीच्या खोतकर बिजनेस सेंटर येथील कार्यालयाची झाडा झडती घेण्यात आली. यावेळी पथकाकडून काही कागदपत्रे ही तपासण्यात आली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजर समितीच्या कार्यालयात ही ईडीच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली.

या वेळी खोतकर बिजनेस सेंटर उभारण्यासाठी कृषी उत्पन्न बाजर समितीकडून देण्यात आलेला ठराव, बिजनेस सेंटर मध्ये उभारण्यात आलेल्या गाळ्याची लिलावाच्या व्यवहाराचे कागदपत्रे ही तपासण्यात आली. खोतकर यांच निवास्थान असलेल्या दर्शना बंगल्यावर पथकाकडून अनेक कागदपत्रांची ही तपासणी करण्यात आली.

सोमय्यांचे आरोप बेछूट आणि पुराव्यांशिवाय असल्याचे खोतकर यांनी म्हटलं आहे. मूल्यांकन करणारांशी संगनमत करून कारखान्याच्या जमिनीची आरक्षित किंमत केल्याच्या सोमय्या यांच्या आरोपाचा खोतकर यांनी इन्कार करून शासनाची बँकेकडे गहाण असलेली जमीन हडप केल्याच्या आरोप खोटे असल्याचे खोतकर यांनी म्हटलं आहे. ''सोमय्या यांचा बोलविता धनी वेगळाच असून यामागे राजकारण आहे,'' असे त्यांनी सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.