Shankar Dhondge News : राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगेंसह मुलाचा पक्षाला रामराम..

Ncp : शंकरअण्णा धोंडगे आणि मुख्यमंत्री केसीआर यांची भेट झाली होती.
Shankaranna Dhondge -K. Chandrasekhar Rao
Shankaranna Dhondge -K. Chandrasekhar RaoSarkarnama

Marathwada : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे (Shankar Dhondge) यांनी नुकतीच भेट घेतली होती. या भेटीनंतर ते बीआरएसमध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यातच आज शंकरअण्णा धोंडगे व त्यांचे पुत्र शिवराज धोंडगे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत आपापल्या पदाचे राजीनामे दिले. त्यांनी अजून बीआरएस पक्षात अधिकृत प्रवेश केल्याची घोषणा केली नसली तरी ते लवकरच या पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते.

Shankaranna Dhondge -K. Chandrasekhar Rao
Eknath Khadse News : महापालिकांमधील नामनिर्देशीत सदस्य संख्येत वाढ भ्रष्टाचारासाठी ?

नांदेडमध्ये या दोघांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. शंकरअण्णा धोंडगे हे माजी आमदार तथा राष्ट्रवादी (Ncp) किसान भारतीचे प्रदेशाध्यक्ष तर त्यांचे चिरंजीव शिवराज हे राष्ट्रवादी युवकचे राज्य सचिव होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक अशी शंकरअण्णा धोंडगे यांची ओळख आहे. (Nanded) के.चंद्रशेखर राव यांनी आपल्या बीआरएस पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रात नांदेड मार्गे त्यांनी प्रवेश केला आहे.

मोठी जाहीर सभा आणि प्रवेश सोहळा घेत बीआरएसने शेती विषयावर काम करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक पक्षाच्या नेत्यांना गळ घातली होती. स्वाभीमानीचे राजू शेट्टी यांना देखील चंद्रशेखर राव यांनी पक्षात येण्याची आॅफर दिली होती. मात्र शेट्टी यांनी ती नाकारली होती. त्यानंतर दोन महिन्यातच शंकरअण्णा धोंडगे आणि मुख्यमंत्री केसीआर यांची भेट झाली होती.

या भेटीतील चर्चेनंतर आज धोंडगे पिता-पुत्रांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. आता त्यांचा बीआरएसमध्ये अधिकृत प्रवेश कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कंधार विधानसभेचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे बीआरएसच्या गळाला लागल्याची चर्चा या राजीनाम्या नंतर होवू लागली आहे.

कंधार तालुक्यातील बाळंतवाडी येथे आज धोंडगे यांची कार्यकत्यार्सोबत बैठक पार पडली. ही बैठक होताच शंकरअण्णा धोंडगे, शिवराज धोंडगे यांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे या दोघांनी आपले राजीनामे पाठवले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in