माजी आमदाराच्या बाॅडीगार्डकडून भाजप कार्यकर्त्याला हातपाय तोडण्याची धमकी

(R. T. Deshmukh's bodyguard Deshmukh called Ghadge and threatened him.)छबन घाडगे या सामन्य कार्यकर्त्याने आर. टी. देशमुख यांनी ‘गोड बोलून कार्यकर्त्यांची वाट’लावली अशी कमेंट केली.
Ex.Mlas Bodyguard Threatened
Ex.Mlas Bodyguard ThreatenedSarkarnama

माजलगाव (जि. बीड) : ज्या कार्यकर्त्याने २० वर्षांपासून भाजपचा झेंडा निष्ठेने खांद्यावर घेतला. बुथ प्रमुख म्हणून निष्ठेने काम केले. त्या खदखद व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्याला माजी आमदाराच्या बॉडी गार्डने चक्क हात पाय तोडून गळ्या बांधण्याची धमकी दिली आहे. तशी ऑडीओ क्लिप सध्या व्हायरलही होत आहे.

मागच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार असतानाही सुमार कामगिरीमुळे माजलगाव मतदार संघातून भाजपने आर. टी. देशमुख यांच्या ऐवजी रमेशराव आडसकर यांना उमेदवारी दिली. मात्र, पक्षातील काही नेत्यांनी अंधारातून राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला.

दरम्यान, पक्षातील गटबाजी सुरुच आहे, त्यामुळे जेष्ठ नेते प्रकाश आनंदगावकर यांच्या पुढाकाराने नुकतीच खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीला देशमुख यांना निमंत्रण नव्हते. आमदारकीच्या काळात त्यांचे पी. ए. म्हणून काम केलेल्या एकाने देशमुख यांना बैठकीला टाळल्याबाबतची पोस्ट सोशल मिडीयावर लिहली.

त्यावर नेटकऱ्यांनी मतमतांतरे व्यक्त केली. याच वेळी छबन घाडगे या सामन्य कार्यकर्त्याने आर. टी. देशमुख यांनी ‘गोड बोलून कार्यकर्त्यांची वाट’लावली अशी कमेंट केली. त्यावर आर. टी. देशमुख यांचा बॉडीगार्ड असलेल्या देशमुख नावाच्या व्यक्तीने घाडगे यांना फोन करुन धमक्या दिल्या. अगदी हात - पाय तोडून गळ्यात बांधण्याची भाषा केली.

Ex.Mlas Bodyguard Threatened
जल संरक्षणाची कामे हाती घेतली तर महाराष्ट्रात कधीच दुष्काळ राहणार नाही

विशेष म्हणजे याच छबन घाडगे यांनी देशमुख यांच्या २००९ व २०१४ च्या निवडणुकांत घरच्या भाकरी खाऊन जिव ओतून काम केले होते. पण, त्यांना तीन लाखांचे कामही मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांची खदखद सहाजिकच होती. पक्षाने उमेदवारीच का टाळली आणि आता बैठकीत बोलविण्याचा त्यांच्या समर्थकांचा अट्टहास का, असा प्रश्न आहे.

छबन घाडगे यांना तु तेलगावला येऊन दाखव असेही धमकावण्यात आले होते. त्यानंतर छबन घाडगे यांच्या रक्षणासाठी भाजपनेते रमेश आडसकर यांच्या समर्थकांची २५ वाहने तेलगावला पोचली. अडचणीच्या काळात पक्षाच्या निष्ठावंतांच्या पाठीमागे आडसकर खंबीर उभे राहात,असल्याचे यावेळी दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com