Beed : माजी मंत्री सुरेश नवले कमबॅकच्या तयारीत, मुख्यमंत्री शिंदेंची दिल्लीत भेट..

शिंदे यांच्यासोबत गेल्यास आपल्याला कमबॅक करता येईल, या हेतूने त्यांनी दिल्लीत शिंदे यांची भेट घेतल्याचे बोलले जाते. (Beed Shivsena)
Cm Eknath Shinde- Suresh Navle News Beed
Cm Eknath Shinde- Suresh Navle News BeedSarkarnama

बीड : कधीकाळी शिवसेनेत असलेले माजीमंत्री सुरेश नवले यांनी आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. (Beed) नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून नवले ओळखले जातात. पण गेल्या काही वर्षापासून ते अडगळीत पडले आहेत. राज्यात सत्तांतर होऊन (Eknath Shinde) एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, ४० आमदारांना घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांच्या बंडाला राज्यभरातून पाठिंबा वाढतोच आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या राजकारणात नवले पुन्हा एकदा सक्रीय होऊ पाहत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज त्यांनी दिल्लीत भेट घेतल्यानंतर ते देखील त्यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चां सुरू झाल्या आहेत. (Shivsena) एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर बीड शहरात सुरेश नवले मित्र मंडळाकडून फटाके फोडून स्वागत करण्यात आले होते. १९९० व१९९५ ला बीड विधानसभेसाठी शिवसेनेकडून राज्यातील सर्वात पहिला उमेदवार म्हणून स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेश नवले यांचे नाव जाहीर केले होते.

अत्यंत विश्वासू म्हणून माजी मंत्री सुरेश नवले ठाकरे परिवाराच्या जवळचे होते. नवले यांच्या काळात बीड जिल्ह्यात शिवसेनेची ताकद होती, कालांतराने भाजप आणि शिवसेनेच्या समझोत्यामुळे शिवसेनेची वाढ खुटंली. शिवसेनेत अनेक नवे चेहरे आले, त्यांना पदे मिळाली आणि नवले बाजूला फेकले गेले.

Cm Eknath Shinde- Suresh Navle News Beed
Jalgaon : गुलाबराव राष्ट्रवादीवर घसरले, म्हणाले, आमच्यामुळे त्यांना जीवदान मिळाले..

राजकारणात कोणत्याही पक्षाशी फारशी जवळीक न साधता त्यांनी सुरेश नवले मित्र मंडळाच्या माध्यमातून बीडमध्ये आपले काम सुरू ठेवले. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी मोठे बंड पुकारल्यानंतर नवले हे देखील सक्रीय झाले आहेत. शिंदे यांच्यासोबत गेल्यास आपल्याला कमबॅक करता येईल, या हेतूने त्यांनी दिल्लीत शिंदे यांची भेट घेतल्याचे बोलले जाते. या भेटीनंतर लवकरच ते शिंदे गटात सहभागी होणार असल्याचे देखील समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in