Basavaraj Patil Son's Wedding: माजी मंत्री बसवराज पाटलांच्या मुलाच्या लग्नात राजकारण्यांसह संत, महंतांचीही हजेरी...

Congress Leader News: पाटील चार दशकापासुन राजकारणात आहेत. उमरगा,औसा विधानसभा मतदार संघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले.
youth Congress Ledadr Sharan Patil News
youth Congress Ledadr Sharan Patil NewsSarkarnama

Dharashiv : विठ्ठलसाई साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) माधवराव पाटील यांचे नातू, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री बसवराज पाटील यांचे सुपुत्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांचा विवाह सोहळा (Youth Congress Leader Sharan Patil News) नुकताच पार पडला. औसा येथील उद्योजक शिरीष उटगे यांच्या कन्या संपदा यांच्याशी रविवारी विठ्ठलसाई कारखान्याच्या परिसरात मोठ्या थाटामाटात हा विवाह संपन्न झाला.

youth Congress Ledadr Sharan Patil News
Eknath Shinde News: भाजपच्या हालचालींनंतर आता शिंदेही अलर्ट, सर्व खासदारांची बोलावली तातडीची बैठक....

वधुवरास आशिर्वाद देण्यासाठी (Congress) काॅंग्रेसचे वरिष्ठ नेते, संत, महंत व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थीत होते. (Osmanabad) पाटील कुटुंबीयांच्या वतीने बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

नवदांपत्यास शुभाशीर्वाद देण्यासाठी डॉ.शिवाचार्य महास्वामीजी (काशीपीठ), श्रीश्री जगद्गुरू राजदेशी केंद्रस्वर महाशिवाचार्य (उज्जैनपीठ), जगद्गुरू चन्नसिद्धाराम पंडिताराध्य (श्रीशैल्यपीठ), जगद्गुरू मल्लिकार्जुन महास्वामीजी (काशीपीठ), ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, शिवाचार्य शांतलिंग शिवाचार्य ज्ञानेश्वर महाराज कानेगावकर, सज्जादशाह हैदरअली (दादापीर दर्गाह निलंगा) आदी (Marathwada) संत, महंताची उपस्थिती होती.

याशिवाय माजी मंत्री पाटील गेल्या चार दशकापासुन राजकारणात आहेत. उमरग्यानंतर लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदार संघाचे दोन वेळा त्यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. एक संयमी, काँग्रेस पक्षाला संजिवनी देणारे नेतृत्व म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते. विविध पक्षातील नेते मंडळीशी त्यांचे मैत्रीपुर्ण संबंध आहेत. त्यामुळे विवाह सोहळ्याला मान्यवरांची मोठी गर्दी होती.

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकुरकर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आशिष दुवाँ, सोनल पटेल, माजी मंत्री नसीम खान, असलम शेख, सिद्धाराम म्हेत्रे, संभाजी पाटील निलंगेकर.

youth Congress Ledadr Sharan Patil News
Ajit Pawar News : ...म्हणून जयंत पाटलांना फोन केला नाही; अजित पवारांनी सांगितलं कारण !

तसेच मधुकरराव चव्हाण, रमेश बागवे, संजय बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे, विलास अवताडे, योगेश मसलगे पाटील, खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, चंद्रपूरचे आमदार सुभाष धोटे, सुरेश धस, ज्ञानराज चौगुले, सचिन कल्याणशेट्टी, अभिमन्यू पवार, कैलास पाटील, विक्रम काळे, सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती.

या शिवाय शेजारच्या कर्नाटकचे आमदार एम.वाय. पाटील, बी.आर. पाटील, शरणू सलगर, सिद्धू पाटील, आमदार रेवू नाईक, माजी आमदार रामहरी रूपनवर, विश्वनाथ चाकोते, धर्माजी सोनकवडे, धीरज पाटील, अर्चना पाटील, बाबा पाटील, अँड. अभय चालुक्य, प्रा. सुरेश बिराजदार, शैलेश पाटील चाकूरकर, अर्चना पाटील चाकुरकर, अशोक पाटील निलंगेकर यांच्यासह देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com