आमदार संदीप क्षीरसागरांना काकांचा धक्का; राष्ट्रवादीचे पाच मोहरे शिवसेनेच्या गळाला...

Jaydatta Kshirsagar|Sandeep Kshirsagar|NCP|Shivsena : शिवसेना नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत उद्या हा प्रवेश होणार आहे.
Beed Shivsena
Beed ShivsenaSarkarnama

बीड : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीला (NCP) धक्का बसला असून राष्ट्रवादीचे पाच मोहरे शिवसेनेच्या (Shivsena) गळाला लागले आहेत. हे पाचही जण राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचे समर्थक अमर नाईकवाडे, फारुक पटेल, गंगाधर घुमरे, नितीन लोढा व प्रेमचंद लोढा हे असून ते उद्या (ता.28 मार्च) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याआधी बीड (Beed) शहरात पक्षप्रवेशासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. बीड शहरात या प्रवेशाबाबत जोरदार पोस्टरबाजी करत राष्ट्रवादीला डिवचले आहे.

Beed Shivsena
मोठी बातमी : मुख्यमंत्री ठाकरेंच्या विरोधात कॉग्रेस आमदाराची सुप्रीम कोर्टात याचिका

उद्या होणाऱ्या या पक्षप्रवेशासाठी बीड शहरात जोरदार तयारी करण्यात आली असून शिवसेना नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम होणार आहे. शहरात लावण्यात आलेल्या बॅनरबद्दल नगरसेवक अमर नाईकवाडे म्हणाले की, शिवसेनेत आम्ही प्रवेश करणार म्हटल्याबरोबर आमच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र उस्फूर्तपणे बॅनर लावल्याचे सांगितले. बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या गटाचे प्रमुख फारुख पटेल यांची आक्रमक विरोधक म्हणून बीड नगरपालिकेमध्ये ओळख आहे. त्याचबरोबर नाईकवाडे हे देखील आक्रमक चेहरा आहे. यामुळे हा संदिप क्षीरसागर आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

Beed Shivsena
राज्यातील नेत्यांचे दाऊदशी संबध; अरुण गवळींच्या पत्नीचा गौप्यस्फोट

बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर घुमरेंनी देखील आमदार संदीप क्षीरसागर यांचे खंदे समर्थक म्हणून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र, आता आमदार झाल्यानंतर मिळणाऱ्या वागणुकीमुळे ते सुद्धा संदीप क्षीरसागरांवर नाराज असल्याने राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून आता हातात शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा होत आहे.

दरम्यान, बीड नगरपालिकेतील विरोधी बाकावर बसणाऱ्या नगरसेवक नाईकवाडेंनी मागील दोन अडीच वर्षांमध्ये कायम बीडचे नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, आता ते भारतभूषण क्षीरसागर यांच्याचं नेतृत्वात काम करण्यासाठी शिवबंधन हाती बांधणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in