शिवसेनेचे आणखी पाच आमदार शिंदे गटाच्या संपर्कात : अब्दुल सत्तारांचा मोठा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासकामाचा वेग पाहून त्या गटातील अजून पाच आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. काही खासदारही योग्य वेळेची वाट पाहून या गटात सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता शिवसेना कुणाची हा प्रश्नच उरत नाही.
Abdul Sattar-Eknath Shinde
Abdul Sattar-Eknath ShindeSarkarnama

परभणी : शिवसेनेचे (Shivsena) आणखी पाच आमदार (MLA) आणि उर्वरित खासदारही (MP) लवकरच आमच्या शिवसेनेत (शिंदे गटात Eknath Shinde) दाखल होतील, असा दावा कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शनिवारी (ता. २४ सप्टेंबर) परभणी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केला. ('Five more Shiv Sena MLAs in touch with Shinde group': Abdul Sattar)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा हिंदू गर्व गर्जना मेळावा आज परभणीत घेण्यात आला. या मेळाव्यात कृषीमंत्री सत्तार यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या प्रवेशाचा दावा केला आहे. कृषी मंत्री सत्तार म्हणाले, ‘‘मागील अडीच वर्षांतील बॅकलॉग भरून काढायचा आहे. आता शेवटच्या वर्षात जोरदार बॅटिंग करून विकासकामे सुरू केली जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासकामाचा वेग पाहून त्या गटातील अजून पाच आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. काही खासदारही योग्य वेळेची वाट पाहून या गटात सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता शिवसेना कुणाची हा प्रश्नच उरत नाही.

Abdul Sattar-Eknath Shinde
शिंदे-फडणवीस सरकारकडून पालकमंत्र्यांची घोषणा; कुणाला मिळाला कोणता जिल्हा पहा...

मराठवाड्यातील कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ, या भागातील प्रगतिशील शेतकरी व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल यावर काम केले जात आहे. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे, असे कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Abdul Sattar-Eknath Shinde
त्या मोठ्या नेत्यानेही स्वतंत्र सहकार मंत्रालय बनवलं नाही : सीतारामन यांचा पवारांवर नाव न घेता निशाणा

परभणी जिल्ह्यात आमदार, खासदार हे शिवसेनेचे (ठाकरे गट) आहेत, त्यामुळे अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. त्या भाषणाचा धागा पकडत कृषीमंत्री सत्तार यांनी या पुढे घाबरू नका! गोरगरिबांना न्याय देण्याच्या कामात कुणी आडकाठी करीत असेल तर ‘आरेऽऽला कारेऽऽने उत्तर द्या! आपली ताकद दाखवून द्या’, असे खुले आव्हान सत्तार यांनी यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले.

Abdul Sattar-Eknath Shinde
तानाजी सावंतांची जिभ घसरली; टीका करताना उद्धव ठाकरेंची लाज काढली...

मेळाव्यास उपनेते विजय नहाटा, माजी खासदार ॲड. सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे, जिल्हा प्रमुख माधव कदम, उपजिल्हा प्रमुख माणिक पोंढे, भास्करराव लंगोटे, दिनेश परसावत आदींची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com