Marathwada Crime news
Marathwada Crime newsSarkarnama

युवकाच्या आत्महत्याप्रकरणी बीडमध्ये पाच सावकारांवर गुन्हा दाखल

त्या दिवशी कुटुंबातील सदस्य बाहेर होते. पंकज एकटाच घरी होता.

बीड : सावकाराचा त्रास असह्य झाल्याने 'मी हे सहन करू शकत नाही, मला माफ करा' असा व्हॉट्सअॅप मेसेज कुटुंबीयांना करत शहरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी दोन आठवड्यांनी, पाच सावकारांविरोधात सोमवारी (ता.१६ मे) बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Marathwada Crime news)

Marathwada Crime news
विधान परिषदेवर जाणार की नाही, राम शिंदेने केले स्पष्ट

पंकज बबन काळे (२१ रा. जिजामाता चौक, बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पंकजचे वडील बबन काळे हे माजलगाव पंचायत समितीत विस्तार अधिकारी आहेत. त्यांनी २०१९ मध्ये दरमहा १० रुपये शेकडा या व्याजदराने किशोर बाजीराव पिंगळे या सावकाराकडून सात लाख रुपये घेतले होते. या बदल्यात गेवराई तालुक्यातील रोहितळ येथील ६० आर जमीन, बीड शहरातील पत्नीच्या नावे असणारे राहते घर सावकार किशोर पिंगळेने नोटरी करून घेतले होते. त्यानंतर व्याजासह मूळ रक्कम पिंगळेला देऊनही त्याने धनादेश न वटल्याप्रकरणी बबन काळे यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर एक मे रोजी विस्ताराधिकारी बबन काळे हे माजलगावला ध्वजवंदनासाठी गेले होते. त्या दिवशी कुटुंबातील सदस्य बाहेर होते. पंकज एकटाच घरी होता. घरी येऊन सावकाराकडून मिळणाऱ्या सततच्या धमकीला वैतागून पंकजने घरी गळफास घेतला होता.

Marathwada Crime news
संभाजीराजेंना पाठिंबा देण्याबाबत भाजपचे ठरेना : तिसऱ्या जागेसाठी हुकमाचे पत्ते!

बबन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किशोर पिंगळे, रणजीत पिंगळे, राजकुमार गुरखुदे, हनुमंत ऊर्फ बंडू पिंगळे आणि आशिष सोनी या संशयितांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. एका सावकाराला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र अद्याप चौघे फरारी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com