MIM ला मोठे खिंडार, जिल्हाध्यक्षांसह पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजप, एमआयएमचा उपयोग मत विभाजनासाठी करत आहे.
MIM ला मोठे खिंडार, जिल्हाध्यक्षांसह पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
MIM corporators join NCPsarkarnama

मुंबई : एमआयएम पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन यांच्यासह लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपालिकेतील पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने खेळलेल्या या खेळीमुळे एमआयएमला (MIM) मोठा झटका बसला आहे.

MIM corporators join NCP
अजितदादांकडून शिवसेनेला दे धक्का; बारणेंच्या विश्वासू सहकाऱ्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

उदगीर नगरपालिकेत एमआयएमचे एकूण सात नगरसेवक होते. या सात नगरसेवकांपैकी पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काही महिन्यात उदगीर नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे उदगीरमध्ये राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे. एमआयएमला पाठबळ देणारे शहर म्हणून उदगीर ओळखले जाते. येथील नगरपालिकेत एमआयएमचे सात नगरसेवक निवडून आले होते.

MIM corporators join NCP
नवाब मलिक एनसीबीला अडचणीत आणणार; वकील लागले कामाला

उदगीर नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. नगरपालिकेची एकूण सदस्य संख्या 44 आहे. भाजपचे 23 सदस्य, काँग्रेसचे 14, एमआयएमचे 7 सदस्य होते. राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांनी एमआयएमचे पाच नगरसेवक आपल्या गळाला लावले आहेत. अल्पसंख्याक समाजाचे मान्यवर नेते भावनेच्या भरात एमआयएममध्ये गेले होते. मात्र, आता या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आहे की भाजप, एमआयएमचा उपयोग मत विभाजनासाठी करत आहे. हे सर्व अल्पसंख्याक समाजाला कळाले आहे. त्यातही मुस्लीम समाजाला हे चांगल्या प्रकारे कळाले आहे. आधी केलेली चूक नंतर होवू नये यासाठी एमआयएमचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. असे जयंत पाटील यांनी या वेळी सांगितले.

Related Stories

No stories found.