NCP-Shivsena-Congress
NCP-Shivsena-CongressSarkarnama

महाविकास आघाडीचा लढाईपूर्वीच भाजपला धक्का

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (Osmanabad District Bank elections) भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता होती.

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (Osmanabad District Bank elections) भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र, या सत्तेला निवडणुकीअगोदरच हादरे बसायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित मोट बांधून भाजपला (BJP) धक्का दिला आहे. पंधरा जागांपैकी पाच जागा अर्ज माघारीच्या आजच्या (ता.१०) शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीच्या खात्यात जमा झाल्या. त्यामध्ये काँग्रेस (congress) दोन, शिवसेना (shivsena) दोन व राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे. सत्तेसाठी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) तीन जागांची गरज असून दहापैकी आठ जागांवर विजय मिळविण्याचे भाजपपुढे कडवे आव्हान निर्माण झाले आहे.

निवडणूक अत्यंत वेगळ्या समीकरणामुळे चर्चेत येणार हे स्पष्ट झाले होते. त्याचप्रकारे निवडणूक एकतर्फी होण्याच्या स्थितीत आल्याचे दिसून येत आहे. भाजप आता उसने बळ आणून लढत असले तरी त्यांना पंधरा जागांवर उमेदवार सुद्धा मिळालेना हीत. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी असलेल्या सत्ता हातात ठेवण्याचे त्यांच्यापुढे आव्हान होते.

NCP-Shivsena-Congress
तानाजी सावंत महाविकास आघाडीसोबतच; राणा पाटलांची कोंडी

मागील निवडणुकीत राष्ट्रवादीत असताना आमदार पाटील व भाजपने आघाडी करून पंधरापैकी नऊ जागा जिंकल्या होत्या. त्यात राष्ट्रवादीच्या आठ जागा होत्या व भाजपची एक जागा येऊनसुद्धा त्यांना उपाध्यक्षपद मिळाले होते. आठपैकी सात संचालक भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्याबरोबर राहिले. बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार राष्ट्रवादीतच राहिल्याने सत्तास्थानी हाच पक्ष राहिला. भाजपमध्ये गेल्यानंतर आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल तयार झाले असले तरी दहाच जागांवर ते निवडणूक लढवत आहेत.

NCP-Shivsena-Congress
जामिनावर सुटलेले नितेश राणे मोदींच्या सभेत पहिल्या रांगेत

दुसऱ्या बाजूला शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजीचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. तरी तिथेही दोन्ही गट महाविकास आघाडीबरोबर राहिल्याचे दिसून येत आहे. आघाडीच्या पक्षांनी प्रत्येकी पाच जागा घेऊन समसमान वाटप केल्याचे चित्र आहे. त्यापैकी पाच जागा तर आताच बिनविरोध झाल्या आहेत. त्यात तुळजापूर सोसायटी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याचे दिसून आले. जिल्ह्याच्या राजकारणात ही महत्त्वाची व समीकरण बदलणारी निवडणूक मानली जात आहे. अगामी नगरपालिका, जिल्हा परिषद-पंचायत समितीची रंगीत तालीम असल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com