Fitness News : रावसाहेब दानवे राजकारणात हीट, तब्येतही फीट..

Raosaheb Danve : गेली ४० वर्ष राजकारणात असलेल्या दानवेंचा उत्साह तसूभर देखील कमी झालेला नाही.
Central Minister Raosaheb Danve Fitness News, Aurangabad
Central Minister Raosaheb Danve Fitness News, AurangabadSarkarnama

ेेMarathwada Political : राजकारणाकडे झटपट श्रीमंत होण्याचा शाॅर्टकट म्हणून पाहिले जाते. आपल्याला राजकारण्यांच्या महागड्या गाड्या, विमान प्रवास, कडक कपडे, विदेश वाऱ्या आणि संपत्ती दिसते, पण राजकारणात यशस्वी होवून घट्ट पाय रोवण्यासाठीची धडपड, कसरत मात्र दिसत नाही. (Political Leader) राजकारण्यांचे दैनंदिन जीवन हे धकाधकीचे, धावपळीचे असते.

Central Minister Raosaheb Danve Fitness News, Aurangabad
Ajanata Caves : सत्तारांनी केंद्रीय मंत्री डाॅ. कराडांकडे मागितले `५० कोटी`..

आज इथे तर उद्या परराज्यात किंवा परदेशात. ना खाण्या-पिण्याच्या वेळा, न पुरेशी झोप. पण अशातही काही राजकारणी आपल्या क्षेत्रात तर हीट आहेच, पण फिटनेस राखत तब्येतीत देखील फीट आहेत. अगदी वयाची ६८ वर्ष पार केली तरी जोश मात्र पस्तीशीतील तरुणासारखा असणारे एक व्यक्तिमत्व (Maharashtra) महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. ते म्हणजे (Raosaheb Danve) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन सारख्या ग्रामीण भागातल्या जवखेडा गावातून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा करणारे दानवे सरपंच ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पदापर्यंत पोहचले. त्याचा हा प्रवास थक्क करायला लावणारा आहे. गेली ४० वर्ष राजकारणात असलेल्या दानवेंचा उत्साह तसूभर देखील कमी झालेला नाही, याचे गुपित म्हणजे अखंडपणे सुरू असलेला व्यायाम. हो ६८ वर्ष वय असलेले रावसाहेब दानवे गावात, मतदासंघात, जिल्ह्याबाहेर, मराठवाड्यात, राज्याबाहेर किंवा अगदी देशाबाहेर असले तरी आपल्या व्यायामात खंड पडू देत नाही.

त्यांच्या या नियमामुळेच आज ते राजकारणात हीट आहेत. हे त्यांना कसं जमतं याबद्दल सांगतांना ते म्हणतात, खाण्यापिण्याचे माझे कुठले नखरे नाहीत, लहानपणी शाळेसाठी केलेली पायपीट शरीर भक्कम करणारी ठरली. तेलकट आणि गोड पदार्थ शक्‍यतो मी टाळतो. नियमित व्यायाम हेच माझ्या फिटनेसचे उघड गुपित आहे. चौथीपर्यंतचे शिक्षण गावात झाले, पुढचे शिक्षण मामाच्या गावी आणि बदनापूरला. घरापासून रोज सात ते आठ किलोमीटर पायपीट करत जावे लागायचे.

लहानपणापासून चालण्याची अंगळवणी पडलेली सवय आज राजकारणात चाळीस आणि वयाची ६८ वर्ष पूर्ण झाल्यावरही कायम आहे. खाण्या-पिण्याचे जास्त नखरे नाहीत, की डॉक्‍टरांनी आखून दिलेला डायट प्लान नाही. रोज किमान पाच किलोमीटर न चुकता चालणे, मिळेल तिथे खाणे, चमचमीत, मांसाहार करतांना तेलकट पदार्थांना बाजूला सारणे, गोड टाळणे आणि सकाळी उठून नियमित व्यायाम हेच माझ्या फिटनेसचे रहस्य आहे.

Central Minister Raosaheb Danve Fitness News, Aurangabad
Ambadas Danve : खैरे आमचे नेते, पंकजांच्या नाराजीबद्दल त्यांनाच अधिक माहिती...

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पालेभाज्या आणि फळांवर भर देत असलो तरी पथ्य असे कुठलेही नाही, म्हणूनच राजकीय दौरे, सभा, मेळावे, बैठका, साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करूनही मला कधी थकवा जाणवत नाही. `उमर पच्चपन की दिल बचपन का` असे आपल्याकडे म्हटले जाते, पण माझ्या बाबतीत `उमर ६८ की, और जोश ३५ का`असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. चाळीस वर्ष मी राजकारणात आहे, अगदी सरपंच ते केंद्रात मंत्रिपदापर्यंतचा माझा प्रवास.

या प्रवासात अनेक चढउतार, राजकीय संघर्ष, मान-अपमान, विरोध, कुरघोडी, आरोप-प्रत्यारोप अशा सगळ्याच गोष्टींना तोंड द्यावे लागते. तणाव आणि थकवा येणे सहाजिकच आहे. शेवटी मी देखील माणूसच आहे, पण जनतेचे प्रश्न सोडवतांना या सगळ्या गोष्टी विसरून नव्या जोमाने कामाला लागावे लागते. धावपळ आणि दगदग आहे म्हणून आराम करत बसलो तर ते शक्‍य नाही. त्यामुळे आरोग्य सांभाळत कामाची तारेवरची कसरत मी पार पडू शकलो.

वजनाचे मीटर डाऊनच..

शालेय शिक्षण घेण्यासाठी दररोज सात ते आठ किलोमीटरची करावी लागलेली पायपीट पुढे माझ्या जीवनाचा एका भाग बनून गेली. राजकारणात आल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत पदयत्रा, सभा या निमित्ताने फिरणे होत असले तरी रोज किमान पाच किलोमीटर पायी फिरण्याचा नियम मी कुठेही असलो तरी सोडला नाही. दोन मित्र सोबत घेतले की देशभरातील घडामोडींवर चर्चा आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी साध्य होतात.

नियमित फिरण्याच्या सवयीमुळे गेल्या चाळीस वर्षात माझ्या वजनाचे मीटर कधी आवश्यकतेपेक्षा पुढे पळाले नाही. ज्या दिवशी फिरणे शक्‍य झाले नाही, त्या दिवशी रात्री उशीर घरी परततांना पाच-सहा किलोमीटर अलीकडेच गाडीतून उतरतो आणि गाडीच्या प्रकाशात पायी चालत घरी येतो. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री असल्यामुळे मतदारसंघ, दिल्ली आणि देशभरातील राज्यांमध्ये फिरावे लागते. शिवाय मंत्री म्हणून पक्ष, संघटना वाढीची जबाबदारी असल्याने त्या भागात देखील सातत्याने दौरे करावे लागतात.

Central Minister Raosaheb Danve Fitness News, Aurangabad
Ambadas Danve : खैरे आमचे नेते, पंकजांच्या नाराजीबद्दल त्यांनाच अधिक माहिती...

सिक्स पॅक नाही, पण शरीर काटक..

रेल्वे, विमान तर कधी चारचाकी गाडीतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासून दिवस सुरू होतो तो रात्री दोन ते तीन किवा त्यापुढेही, वेळेची मर्यादा नाही. पण तक्रार करणे हा माझा स्वभाव नसल्यामुळे आपल्या कामाच्या गरजेनुसार शरीर बळकट आणि सदृढ बनवण्यावर मी भर दिला. अगदीच आजच्या तरुणांप्रमाणे सिक्‍स पॅक वगैरे नाही, पण वजनावर नियंत्रण ठेवत काटक शरीरयष्टी मी कमावली आहे.

दिल्लीत असेन तेव्हा बंगल्याच्या आवारात, संसद परिसरात फेरफटका मारत व्यायामाचे विविध प्रकार मी नियमितपणे करत असतो. मुंबईत समुद्र किनाऱ्यावर सकाळची शुध्द हवा घेत फिरणे म्हणजे पर्वणीच. भकरदनला मात्र दररोज सकाळी काही खास मित्रांसोबत गावापासून पाच-सहा किलोमीटरची पायपीट करतो. बंगल्यात अनेक व्यायामाचे प्रकार आणि साहित्य बसवले आहे. त्यावर तासभर व्यायाम केला की आलेला थकवा चुटकीसरशी नाहीसा होता.

Central Minister Raosaheb Danve Fitness News, Aurangabad
Sandipan Bhumre : आमचं कुणीबी उभं राहूंन द्या, खैरेचं डिपाॅझीटच जप्त करू..

खातांना चतकोर कमी हे धोरण..

दररोजचे राजकीय कार्यक्रम, दौरे, बैठका आणि त्यात भेटायला येणाऱ्यांची संख्या बरीच असते. भोकरदनला असलो की माझा दरबार भरलेला असतो. अगदी सकाळी व्यायाम सुरू असतो तेव्हापासून लोक येतात. त्या सगळ्याशी व्यायाम करतांनाच मी संवाद साधतो. त्यामुळे एकीकडे वेळेची बचत आणि समोरच्या व्यक्तीचे गाऱ्हाणे ऐकणे अशी दोन्ही कामे होतात. घरी जेवण्याचा योग तसा कमीच येतो, सततच्या दौऱ्यांमुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या घरीच जेवावे लागते.

त्यामुळे माझी स्वतःची अशी काही आवड राहिलेलीच नाही. कार्यकर्त्यांची आवड हीच माझी आवड, मग कधी ठेचा भाकरी, पिठलं, तर कधी मटन. पण हे खात असतांना चतकोर कमी हे धोरण कायम ठेवले. गोड पदार्थ टाळतो, फळ, पालेभाज्या यावर अधिक भर देतो आणि हो राजकारणात असूनही मी व्यसनापासून कोसो दूर आहे हेच माझ्या आरोग्य धनसंपदेचे गुपित आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा शिरस्ता यापुढेही कायम ठेवण्याचा माझा मानस आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com