आधी लातूरचा पाणी प्रश्न सोडवा, मगच निलंग्याच्या विकासावर बोला

(Bjp Mla Sambhaji Patil Nilangekar) निलंगा मतदार संघातून जोपर्यंत रेल्वे धावणार नाही तोपर्यंत मी डोक्याला फेटा बांधणार नाही. आता मला चिंता करण्याचे कांहीच कारण नाही.
Mla Sambhaji Patil Nilangekar-Amit Deshmukh
Mla Sambhaji Patil Nilangekar-Amit DeshmukhSarkarnama

निलंगा : लातूर शहरातील नागरिकांना पंधरा दिवसाला पाणी मिळते तर निलंगा शहराला चोवीस तास. तेव्हा अगोदर लातूरचा पाणीप्रश्न सोडवा मगच निलंग्याच्या विकासावर बोला, असा टोला माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांना नाव न घेता लगावला.

निलंगा शहरातील विविध विकास कामाचे लोकार्पण निलंगेकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलेल्या विकासाच्या, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आपण वर्षापासून काम करत आहोत. निलंग्यात येऊन विकास कामाबद्दल बोलणाऱ्यांनी आधी लातूरला रोज पाणी द्यावे, मगच निलंग्याच्या विकासावर बोलावे, असा चिमटा अमित देशमुख यांना काढला.

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर संस्कृतिक सभागृहांमध्ये कुठलाही राजकीय कार्यक्रम होणार नसून निलंग्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी या सभागृहाच्या माध्यमातून संस्कृतिक, सामाजिक, वैचारिक कार्यक्रम घेतले जातील असे निलंगेकर यांनी स्पष्ट केले. मुलांच्या भविष्यातील जडणघडण करण्यासाठी मोलाचे कार्य या सभागृहातून करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक वारसा जपणे हे आपले मुख्य कर्तव्य असून याच निलंग्यामध्ये वंदे मातरम या कार्यक्रमापासून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात झाल्याचे सांगत संभाजी निलंगेकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. जीवनामध्ये चढ-उतार येतच असतात अडचणीच्या काळामध्ये जी माणसं आपल्या सोबत राहिली अशा माणसांना आपण कधीही विसरलेलो नाही.

Mla Sambhaji Patil Nilangekar-Amit Deshmukh
पुणे वक्फ बोर्डातील घोटाळा लपवण्यासाठी मलिकांकडून आरोपांची सर्कस

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी दूरदृष्टी ठेवून शंभर किमी अंतरावरून निलंगा शहरासाठी पाणीपुरवठ्याची योजना आणली होती. तीच योजना पुनर्जीवित करून निलंगा नगर पालिकेच्या माध्यमातून निलंगा शहरासाठी २४ तास पाणी उपलब्ध करून दिलेले आहे.

तालुक्याच्या दळणवळणासाठी लातूर ते जहीराबाद हा महामार्ग आपण आपल्या प्रयत्नातून पूर्ण केला असून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना निलंग्यात बोलवून तालुक्यातून रेल्वे मार्ग करण्याची मागणी केली होती. प्रधानमंत्री मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने या रेल्वेमार्गासाठी ५० लाखाचे टोकन ही भरल्याचे ते म्हणाले.

निलंगा मार्गे नव्याने रेल्वे लाईन सुरू करण्याचे आपले उद्दिष्ट असून ते आपण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. निलंग्याचा विकास हाच आपला एकमेव ध्यास असल्याचेही निलंगकरे यावेळी म्हणाले. निलंगा शहराचा विकास निधी रोखणाऱ्या पालकमंत्र्यांना निलंग्यात येण्याचा आधिकार नाही शहराच्या व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी पालकमंत्री असताना आणलेला निधी जाणूनबुजून थांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

फेटा बांधणार नाही

निलंगा मतदार संघातून जोपर्यंत रेल्वे धावणार नाही तोपर्यंत मी डोक्याला फेटा बांधणार नाही. आता मला चिंता करण्याचे कांहीच कारण नाही. तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या मागणीला मान्यता दिली. आता तर मराठवाड्याचे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे व जुन्या बिदर जिल्ह्याचे रेल्वेमंत्री भगवंत खुब्बा हे माझ्या डाव्या व उजव्या बाजूला असल्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असेही निलंगकेर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com