रस्त्याने निघालो तर पन्नास हजार लोक नमस्कार करतात ; टीका करणाऱ्यांना किंमत देत नाही..

मंत्रीपद मिळाले तर ठीक नाही, तर माझी काही हरकत असणार नाही, मला फक्त माझ्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळावा हीच अपेक्षा. (Mla Pradip Jaiswal)
Mla Pradip Jaiswal, Aurangabad
Mla Pradip Jaiswal, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : कोणी कितीही टीका केली तरी त्याला मी उत्तर देणार नाही. प्रदीप जैस्वाल काय आहे हे या शहरातील जनतेला चांगले माहित आहे. (Aurangabad) आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जर मी शहरात रस्त्याने फिरलो तर पन्नास हजार लोक मला नमस्कार करतात. त्यामुळे टीकाकरांना मी किमंत देत नाही, अशा शब्दात आमदार प्रदीप जैस्वाल (Pradeep Jaiswal) यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना सुनावले.

एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यानंतर झालेल्या सत्तांतरात त्यांना मिळालेले मुख्यमंत्रीपद या सगळ्या घडामोडीनंतर त्यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. (Marathwada) मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल हे देखील शहरात दाखल झाले. आज त्यांनी मतदारसंघातील गणपती मंदीरात जाऊन समर्थकांसह आरती केली आणि आपल्या संपर्क कार्यालयात प्रसार माध्ममांशी संवाद साधला.

जैस्वाल म्हणाले, सत्ताधारी पक्षातील मंत्री,आमदार आणि अपक्ष असे ५० लोक बाहेर पडतात यामागे काहीतरी कारण निश्चितच असले. ते कारण म्हणजे मतदारसंघातील कामांना लागलेला ब्रेक आणि मिळत नसलेला निधी हे होते. कुणीही पैशासाठी किंवा मंत्रीपदासाठी बाहेर पडले नाही. मला २५ कोटींचे टोकन मिळाले असे आरोप केले जातात. पण मी या शहरात नगरसेवक, महापालिकेत स्थायी समिती सभापती, महापौर, आमदार, खासदार राहिलेलो आहे.

महापालिकेतल्या एका अधिकाऱ्याने सांगावे की मी कधी त्यांच्याकडून पाचशे रुपये मागितले. तेव्हा अशा आरोपांना काही अर्थ नाही, मी त्याला उत्तर पण देणार नाही. माझ्या मतदारसंघातील तीन पुलांच्या कामासाठी २००९ पासून मी साडेअकरा कोटींचा निधी मागतोय. आता देखील अजित पवारांनी मला आश्वासन दिले होते, पण ते पुर्ण केले नाही. दहा-बारा वर्ष निधी मागून मिळत नसेल तर मग काय करायचे. कामे होत नसतील तर आमदार म्हणून माझा काय उपयोग?

केवळ याच एका कारणाने मी व माझ्या सारखे असंख्य आमदार बाहेर पडले. हे एकाचवेळी घडलेले नाही, आमदार, मंत्र्यांची नाराजी उद्धव साहेबांच्या कानावर वेळोवेळी घातली होती. एकनाथ शिंदे स्वतः पाचवेळा त्यांच्याशी बोलले. पण त्यावर काही विचार झाला नाही. उलट राष्ट्रवादी, काॅंग्रेसच्या आमदारांना जास्त निधी मिळत होता. आमच्या मतदारसंघात देखील हेच होत होते, मग आमच्यापुढे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता.

Mla Pradip Jaiswal, Aurangabad
सत्तेतील लोकांनी केलेला इतिहासातील हा सर्वात मोठा उठाव ; पद ,पैशासाठी नाही..

मी शिवसेनेच्या कार्यक्रमात उपस्थीत नसायचो हे सांगितले जाते, पण त्यामागे माझ्या पायाचे दुखणे हे कारण होते. तरी देखील मी मतदारसंघातील अनेक रस्त्यांच्या उद्धाटनाला हजर राहयचो. आम्हाला गद्दार, बंडखोर असे काहीही म्हटले जात असले, तरी आम्ही आजही बाळासाहेब ठाकरेंना मानणारे शिवैनिकच आहोत.

मातोश्रीबद्दल आजही आमच्या मनात तितकाच आदर असल्याचेही जैस्वाल म्हणाले. तुम्हाला मंत्रीपद मिळणार का? यावर मंत्रीपद मिळाले तर ठीक नाही, तर माझी काही हरकत असणार नाही, मला फक्त माझ्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळावा हीच अपेक्षा असल्याचेही जैस्वाल म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com