Nanded : छप्पन दिवस, सात राज्यात तपास ; बियाणी हत्या प्रकरणात सहा आरोपींना बेड्या

सदर गुन्ह्याबाबत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात जाऊन तपास करण्यात आला. (Nanded)
Nanded Police
Nanded PoliceSarkarnama

नांदेड : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा उलगडा करण्यात नांदेड पोलिसांना यश आले आहे. (Nanded) याबाबतची माहिती विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी व पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी बुधवारी पञकार परिषदेत दिली. पाच एप्रिल रोजी नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या (Murder) केली होती.

सदर प्रकरणात विमानतळ पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Marathwada) सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशान्वये एसटीआयची स्थापना करण्यात आली होती.

याचे प्रमुख भोकरचे सहाय्यक पोलिस अधिक्षक विजय कबाडे व त्यांच्या मदतीला अतिरिक्त पोलिस अधिक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, डी डी भारती, संतोष शेकडे शिवसांब घेवारे, चंद्रकांत पवार, दशरथ खाडे, गंगाप्रसाद दळवी, पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे, बोराटे, दत्तात्रय काळे गणेश घोडके आदींनी तपास केला.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा, पोलिस ठाणे यांच्यामार्फत ५६ दिवसांपासून तपास करणे चालू होते. सदर गुन्ह्याबाबत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, तेलंगणा व कर्नाटक या राज्यात जाऊन तपास करण्यात आला. तपासादरम्यान आत्तापर्यंत सहा आरोपी निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या नंतरही तपासात आणखी काही धागेदोरे मिळतील अशी दाट शक्यता पोलिसांना आहे.

सगळे आरोपी नांदेडचेच..

अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये इन्‍द्रपालसिंह उर्फ सनी सिंग मेजर (वय ३५) मुक्तेश्वर उर्फ गोलू विजय मंगनाळे (वय २५) सतनाम सिंग उर्फ दलबिर सिंह शेरगिल (वय २८) हरदीपसिंग उर्फ सोनू पिनिपाना सतनाम सिंग बाजवा(वय ३५) गुरूमुखसिंग उर्फ गुरी सेवकसिंग गील (वय २४) आणि करणजितसिंग रघबिरसिंग साहू (वय ३०, सर्व राहणार नांदेड) यांना अटक करण्यात आली आहे.

Nanded Police
Imtiaz Jalil : गेल्यावेळी पाच हजार मतांनी निवडून आलो, २०२४ मध्ये पन्नास हजार मतांनी येईन..

दरम्यान, या घटनेचा फायदा घेऊन खंडणी वसुलीसाठी काही गुन्हेगारांनी प्रयत्न केले त्यांच्याविरुद्ध स्वतंत्रपणे पोलीस ठाणे भाग्यनगर आणि विमानतळ येथे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. यानंतरही कोणाला खंडणीसाठी मागणी होत असल्यास त्यांनी नांदेडचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन निसार तांबोळी यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com