Aurangabad : उद्धव ठाकरेंच्या रेकाॅर्डब्रेक सभेसाठी पंधराशे बैठका, नेत्यांचे दौरे..

यापुर्वी अनेकदा त्यांच्या या मैदानावर निवडणुक प्रचार सभा, विजयी सभा, मेळावे झालेले आहेत. पण ८ जून रोजी होणाऱ्या सभेची यावेळी होणारी तयारी पाहता ही सभा शिवसेनेसाठी विशेष असणार आहे. (Shivsena)
Shivsena Chief Uddhav Thackeray
Shivsena Chief Uddhav ThackeraySarkarnama

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी झालेली मशिदीवरील भोंग्याच्या विषयावरची सभा आणि त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी निघालेला जल आक्रोश मोर्चा यावर शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या रेकाॅर्डब्रेक सभेने जोरदार प्रतिहल्ला चढवण्याच्या तयारी आहे. शिवसेनेचे नेते कितीही सागंत असले की ही सभा कुणाला उत्तर देण्यासाठी किंवा शक्ती प्रदर्शनासाठी नाही, तरी सभेसाठी सुरू असलेली तयारी, बैठका आणि नेत्यांचे दौरे पाहता शिवसेना यातून मोठे शक्ती प्रदर्शन करणार एवढे मात्र निश्चित.

येत्या पाच-सहा महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळ्याच राजकीय पक्षांनी औरंगाबादेत (Aurangabad) आपली ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. मनसे-भाजप -एमआयएम हे तीन प्रमुख पक्ष महाविकास आघाडीचे विरोधक म्हणून मैदानात असणार आहेत. (Marathwada) भाजप आणि मनसेने पाणी प्रश्नावरून शिवसेनेची कोंडी करण्यासाठी सुरु केलेले प्रयत्न काही अंशी यशस्वी ठरल्याचे सध्या तरी चित्र आहे. पण पाणी प्रश्नावरून होणारे डॅमेज कंट्रोल कसे करायचे याची रणनिती शिवसेनेने देखील आखली आहे.

पाणीपट्टीमध्ये ५० टक्यांची कपात. शहरासाठीच्या पाणीपुरवठ्यात एक एमएलडीने वाढ करण्यात आलेले यश पाहता प्रत्यक्ष निवडणूका जाहीर होईपर्यंत शिवसेना पाणी प्रश्नावर बऱ्याच प्रमाणावर मात करेल असे चित्र आहे. शिवाय पावसाळा तोंडावर असल्यामुळे हा मुद्दा काहीसा मागे देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु पाणी प्रश्नाला शिवसेनाच कशी जबाबदार आहे हे औरंगाबादकरांच्या मनावर बिंबवण्यात भाजपचे नेते यशस्वी ठरल्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

Shivsena Chief Uddhav Thackeray
राज्यसभा निवडणूक चुरस वाढली : धनंजय महाडिकांना पहिला अपक्ष आमदार मिळाला

यावर येत्या ८ जून रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेतून एक घाव दोन तुकडे करण्याची तयारी शिवसेनेने चालवली आहे. मराठवाड्यात स्थापन झालेल्या शिवसेनेची पहिली शाखा औरंगाबादमध्ये ८ जून १९८५ रोजी स्थापन झाली होती. या पहिल्या शाखेच्या वर्धानपनदिनीच उद्धव ठाकरे मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेणार आहेत. यापुर्वी अनेकदा त्यांच्या या मैदानावर निवडणुक प्रचार सभा, विजयी सभा, मेळावे झालेले आहेत. पण ८ जून रोजी होणाऱ्या सभेची यावेळी होणारी तयारी पाहता ही सभा शिवसेनेसाठी विशेष असणार आहे हे लक्षात येते.

या सभेच्या नियोजनासाठी मुंबईत वरिष्ठ नेत्यांनी दोन बैठका घेतल्या, त्यानंतर जिल्ह्यात तब्बल पंधराशे बैठका घेऊन या सभेचे नियोजन केले जात आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे सगळे नेते, पदाधिकारी गेल्या आठवडाभरापासून जोमाने कामाला लागले आहेत. गावागावात, वार्डावार्डात बैठका सुरू आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ही सभा रेकाॅर्डब्रेकच होणार असे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com