Beed News : सरपंच पदाच्या उमेदवाराच्या निशाणीसमोरील बटनावर फेविक्वीक टाकले..

Gram Panchayat Election : सरपंच पदाचे उमेदवार गणेश वाने यांना तक्रार देण्यास सांगितले.
Gram Panchayt Election News, Beed
Gram Panchayt Election News, BeedSarkarnama

Gram Panchayat Election : जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू असतांना एका गावात ईव्हीएम मशीनमधील सरपंच पदाच्या उमेदवारासमोरील निशाणीचे बटन टक्क फेवीक्वीक टाकून ब्लाॅक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Beed News

Gram Panchayt Election News, Beed
Harshvardhan Jadhav : शिवाजी महाराजांची बदनामी रोखण्यासाठी शेत विकून स्वाभीमान यात्रा काढणार..

मतदान करतांना बटन दबत नसल्याचे समोर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. बीड लिंबागणेश गावातील ग्रामपंचायत (Gram Panchayat Election) व सरपंचपदासाठी आज मतदान पार पडत आहे. (Beed) गावातील जिल्हा परिषेदेच्या शाळेत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती.

दरम्यान, सरपंच पदाचे उमेदवार गणेश कल्याण वाने यांच्या तीन नंबरवर असलेल्या शिटी निशाणीसमोरील बटणावर अज्ञात व्यक्तीने फेविक्विक टाकल्याचा प्रकार समोर आला. ईव्हीएम मशीनवरील बटण दबत नसल्याचे मतदारांच्या लक्षात आल्यावर हा सर्व प्रकार समजला.

त्यानंतर एक तास मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. उपविभागीय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राला भेट देत पाहणी केली. तसेच सरपंच पदाचे उमेदवार गणेश वाने यांना तक्रार देण्यास सांगितले. तक्रारीनंतर संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल दाखल करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com