Fauzia Khan : बिल्किस बानो प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले पाहिजे..

गुजरात सरकारने त्या आरोपींची शिक्षा माफ करून त्यांना मुक्त केले आहे. या विरोधात देशभरात संतापाचे वातावरण आहे. (Mp Fauzia Khan)
Ncp Mp Fauzia Khan News Parbhani
Ncp Mp Fauzia Khan News ParbhaniSarkarnama

परभणी : गुजरातच्या गोध्रा दंगलीतील बिल्किस बानो प्रकरणात ११ दोषींच्या सुटकेविरोधात देशभरात तीव्र निदर्शने, आंदोलने सुरू आहे. (Parbhani) अनेक सामाजिक संघटना व महिला मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्या आहेत. यातच राज्यसभेतील राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी बिल्किस बानो (Marathwada) प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले पाहिजे, अशी संतप्त मागणी केली आहे.

परभणीत पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बिल्कीस बानोला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले पाहिजे. (Gujrat) गुजरात मधील बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ जणांची सुटका झाल्याने सर्वसामान्य व्यक्तीचा न्यायसंस्थेवरील विश्वास उडत चालला आहे.

या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की होत असल्याने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले पाहिजे, अशी मागणी खान यांनी केली. गुजरात सरकारने बिल्किस बानोच्या खटल्यातील दोषींना सुनावलेली शिक्षा माफ केल्याच्या विरोधात सामाजिक संघटना व महिला रस्त्यावर उतरल्या आहेत.

गोध्रा येथे झालेल्या हत्याकांडानंतर संपूर्ण गुजरात राज्यात जातीय दंगली उसळल्या होत्या. त्यावेळी बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार झाला होता. ती गरोदर असताना तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आले होते. कोर्टाने या प्रकरणात अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

Ncp Mp Fauzia Khan News Parbhani
Aurangabad : मंत्री झाल्यानंतर अब्दुल सत्तारांनी दर्ग्यावर चढवली चादर..

पण गुजरात सरकारने त्या आरोपींची शिक्षा माफ करून त्यांना मुक्त केले आहे. या विरोधात देशभरात संतापाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष व राज्यसभा खासदार फौजिया खान यांनी या प्रकरणावर संतप्त भूमिका घेत वरील मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com