जो शेतकऱ्यांना आडवा येईल, त्याला तुडवा

(Swabhimani Shetkari Sanghatna)आपल्या आईच कुंकू पुसायला उठलेल्या राजकारणी आणि अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांच्या पोरांनी भगतसिंग होऊन आता रस्त्यावर उतरावे.
जो शेतकऱ्यांना आडवा येईल, त्याला तुडवा
Ravikant Tupkar BeedSarkarnama

बीड ः राज्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, त्याला मदतीचा हात देण्याची गरज असतांना काहीजण आमदार-खासदारांचा वाढदिवस साजरा करतात. पण असे वाढदिवस साजरा करणाऱ्यांनो कदी बापाचा वाढदिवस साजरा केला होता का? असा संतप्त सवाल करत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तूपकर यांनी शेतकऱ्यांना जो आडवा येईल, त्याला तुडवा असे आवाहन केले.

बीड जिल्ह्यातील बनसारोळा येथे स्वाभीमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित ऊस परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना रस्त्यावर उतरून लढाईसाठी तयार राहण्याचे आवाहन देखील केले. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागर यात्रा सूरू आहे. या निमित्ताने बीड जिल्ह्यात ऊस परिषद घेण्यात आली.

केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघाती टीका करत शेट्टी यांनी पीक विमा कंपन्यांशी केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांचे लागेबांधे असल्याचा आरोप केला. या परिषदेत रविकांत तुपकर यांनी देखील आक्रमक भाषण केले. तुपकर म्हणाले, आमदार खासदारांचा वाढदिवस साजरा करणाऱ्यांनो बापाचा वाढदिवस कधी साजरा केला का ?

शेतकरी संकटात असतांना त्याला मदतीचा हात देणे गरजेचे आहे, शेतकऱ्यांचे क्रांतीसिंह नाना पाटील राजू शेट्टी आहेत, त्यामुळे या पुढाऱ्यांना अजिबात घाबरू नका. हे पुढारी आपली लफडी बाहेर येतील म्हणून बायकोलाच घाबरतात, असा टोला तूपकर यांनी लगावला. पावसाने सगळे सोयाबीन गेले, शेतातली परिस्थिती पाहवत नाही. आता लढाई लढावी लागेल त्याशिवाय पर्याय नाही.

Ravikant Tupkar Beed
पीक विमा कंपन्यांच्या दरोड्याला केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांचे पाठबळ?

शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, जो शेतकऱ्यांना आडवा येईल त्याला तुडवा, आडवं करा, असे आवाहन देखील तूपकर यांनी यावेळी उपस्थितांना केले. अतिवृष्टी, पूराच्या संकटाने एकटा शेतकरीच नाही तर त्याच अख्ख कुटुंब उद्धवस्त होतं. त्यामुळे आपल्या आईच कुंकू पुसायला उठलेल्या राजकारणी आणि अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांच्या पोरांनी भगतसिंग होऊन आता रस्त्यावर उतरावे, असे आवाहन तुपकर यांनी केले.

Related Stories

No stories found.