निष्क्रिय पालकमंत्र्यांमुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही

(Bjp Mla Sambhaji Patil Nilangekar) आमच्या काळात तातडीने पंचनामे करून भरपूर मदत मिळवून दिली होती. (Latur District) या सरकारने सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे.
निष्क्रिय पालकमंत्र्यांमुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही
Mla Nilangekar With Amit DeshmukhSarkarnama

निलंगा : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील सर्व पिके उध्वस्त झाली आहेत. अशा संकटाच्यावेळी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज होती, मात्र हे सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे. जोपर्यत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही, तोपर्यत स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.

पालकमंत्री अमित देशमुख हे निष्क्रिय असल्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याची टीकाही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या ७२ तास अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीव निलंगा येथे बैठक घेण्यात आली. भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

राजकारणात काम करत असताना किती मोठ्या पदावर गेलोतरी जनतेचा कार्यकर्ता म्हणून काम करावे ही भावना पदाधिका-यांनी ठेवली पाहिजे. राजकारणात सत्ता येते जाते मात्र सत्तेच्या काळात व सत्ता नसलेल्या काळात कोण कार्यकर्ता सोबत राहतो ही खरी परिक्षा असते. त्यामुळे पदाधिका-यांनी जमीनीवर रहावे, असा सल्ला निलंगेकरांनी उपस्थितांना दिला.

अतिवृष्टीने मांजरा व तेरणा काठावरील शेतकऱ्यांचे पुराने मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांची चेष्टा केली जात आहे. आमच्या काळात तातडीने पंचनामे करून भरपूर मदत मिळवून दिली होती. या सरकारने सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, अशी मागणीही निलंगेकरांनी यावेळी केली.

सोमवार ते बुधवार असे तीन दिवस लातूर येथील शिवाजी चौकात जिल्ह्यातील ७२ शेतकरी ७२ तास अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. एवढे करूनही सरकारला जाग येत नसेल तर १६ आक्टोबर रोजी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेला या सरकारला सदबुद्धी यावी, यासाठी पदयात्रा काढून साकडे घालण्यात येईल असेही निलंगेकर यांनी सांगितले.

या शिवाय लवकरच विधानभवनावर मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेट देणार असल्याचे ते म्हणाले. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून कार्यकर्त्यांनी पाठींबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही निलंगेकर यांनी केले.

Mla Nilangekar With Amit Deshmukh
लातूरात सव्वा कोटींचा गुटखा जप्त; पोलिसांचा माफियांना दणका

सिंहासन हे आमचे ध्येय नसून संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कठोर पावाले उचत जेलभरो आंदोलन करू व सरकारला नुकसानभरपाई देण्यास भाग पाडू असा, निर्धार देखील बैठकीत व्यक्त करण्यात आला.

जुलै महिण्यात झालेल्या अतिवृष्टीचा एक रूपयाही लातूर जिल्ह्याला मिळाला नाही, अशी खंत व्यक्त करतांनाच पालकमंञी निष्क्रिय असल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव नसलेला हा पालकमंञी असल्याची टीकाही अमित देशमुख यांच्यावर निलंगेकर यांनी केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in