चक्क हेलिकॉप्टर खरेदीसाठी शेतकऱ्याने मागितले बँकेकडे कर्ज!

हेलिकॉप्टर व्यवसायात तासाला ६५ हजार रुपये भाडे मिळते.
Farmers (File Photo)
Farmers (File Photo)Sarkarnama

हिंगोली : ताकतोडा (ता. सेनगाव) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने (Farmer) चक्क हेलिकॉप्टर (Helicopter) खरेदीसाठी बँकेकडे कर्जाची (Loan) मागणी केली आहे. यासंदर्भात त्याने स्टेट बँकेच्या (State Bank) गोरेगाव (ता. सेनगाव) शाखा व्यवस्थापकांकडे गुरुवारी (ता.१६) पत्र दिले आहे. कैलास पतंगे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

Farmers (File Photo)
विधान परिषद निवडणुकीत भाजपला दे धक्का; काँग्रेसने विजय नोंदवून रचला इतिहास

ते म्हणतात, ‘निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमधून अपेक्षित उत्पादन आणि उत्पन्न हाती पडत नाही. काबाडकष्ट करूनही शेतकरी नेहमीच अडचणीत येतात. अडचणींचा सामना करूनही शेतकरी पुढील हंगामासाठी आशावादी असतात. तरीही अडचणींची दृष्टचक्र संपत नाही. त्यामुळे शेतीला पर्याय म्हणून दुसरा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्टेट बँकेच्या गोरेगाव शाखेकडे सहा कोटी ६५ लाखांचे कर्ज मागितले आहे.

Farmers (File Photo)
"उधारी कधी देणार"; सदाभाऊ म्हणाले, मी त्या हॉटेलवाल्याला ओळखत नाही...

दरम्यान, हेलिकॉप्टर व्यवसायात तासाला ६५ हजार रुपये भाडे मिळते. त्यामुळे हा विचार केल्याचे शेतकऱ्याने सांगितले. आता या कर्ज मागणीबाबत बॅंक शाखाधिकारी कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com