नितेश राणेंवर सरकारच्या दबावापोटी खोट्या केसेस, त्यांना जामीन नक्कीच मिळेल

महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एन.डी. पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. संयुक्त महाराष्ट्र, गिरणी कामगार यांच्यासाठी त्यांनी प्रदीर्घ लढा दिला. (Railway State Minister Raosaheb Danve)
Raosaheb Danve-Nitesh Rane
Raosaheb Danve-Nitesh RaneSarkarnama

जालना : आमदार नितेश राणे यांच्यावर सरकारच्या दबावामुळे खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या. (Mla Nitesh Rane) उच्च न्यायालयाने आज त्यांचा अटकपुर्व जामीन अर्ज नाकारला असला तरी राणे यांना अपील करण्याची संधी आहे. (Bjp) आमचा न्यायालयावर पुर्ण विश्वास असून नितेश राणे यांना नक्कीच जामीन मिळेल, असा विश्वास केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister Raosaheb Danve) यांनी व्यक्त केला. (Marathwada)

जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना दानवे यांनी नितेश राणे यांच्या अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या निर्णयावर भाष्य केले. महाविकास आघाडी सरकारने सुडबुद्धीतून नितेश यांच्यावर खोट्या केसेस दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले. त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला. उच्च न्यायालयात त्यांना अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला असला तरी त्यांना या निर्णयाविरुध्द अपील करण्याची संधी आहे. ते निश्चित अपील करतील आणि त्यांना न्यायालयाकडून नक्कीच जामीन मिळेल, असेही दानवे म्हणाले.

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या निधनाने संपुर्ण महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये एन.डी. पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. संयुक्त महाराष्ट्र, गिरणी कामगार यांच्यासाठी त्यांनी प्रदीर्घ लढा दिला. त्यामुळे त्यांच्या जाण्याने अवघ्या महाराष्ट्राचं नुकसान झाले असल्याची भावना देखील दानवे यांनी व्यक्त केली.

लसीकरणाबद्दल आता लोकांमध्ये जनजागृती मोठ्या प्रमाणात झाल्याने लसीकरणासाठी सक्ती करण्याची गरज राहिली नाही. केंद्राने राज्याला कधीही लसी पुरवण्यात हात आखडता घेतला नाही, मुबलक प्रमाणात लसींचा पुरवठा राज्याला करण्यात आला. राज्याने केंद्रावर आरोप करताना वस्तुस्थिती जाणून घेऊन आरोप करावेत, असेही दानवे म्हणाले.

Raosaheb Danve-Nitesh Rane
जिल्हा दूध संघ : भाजपशी हातमिळवणी काळेंच्या अंगलट; काॅंग्रेसमध्ये भडका..

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दानवे यांची दिल्लीत भेट घेतली होती. यावर सत्तार हे माझ्या लोकसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधी असून त्यांच्या कामासाठी ते माझ्याकडे आले होते. या भेटीकडे राजकीय हेतूने बघंण चुकीचे असल्याचे दानवे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com