याकूबचा मृतदेह ताब्यात दिला तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, मग त्यांना जबाबदार धरायचे का ?

ही कबर ज्या प्रभागात आहे, त्या प्रभागात त्यावेळी भाजपच्या नगरसेविका होत्या. (Opposition Leader Ambadas Danve)
Opposition Leader Ambadads Danve-Dcm Fadanvis News
Opposition Leader Ambadads Danve-Dcm Fadanvis News Sarkarnama

औरंगाबाद : दहशतवादी याकूब मेमनच्या बडा कब्रस्तान येथील कबरीवर एलईडी दिवे लावणाऱ्या दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. (Shivsena) याकूब मेमनच्या कबरीचे उद्दातीकरणाचे समर्थ कोणीही करणार नाही. पण यावरून राजकारण करणे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आरोप किंवा त्यांना माफी मागावी अशी मागणी करणे म्हणजे नादानपणाचे लक्षण असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

मुंबई बाॅम्ब स्फोटातील आरोपी दहशतवादी याकूब मेमन यांच्या कबरीचे सुशोक्षीकरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून (Bjp) भाजपने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तर उद्धव ठाकरे यांनी राज्याची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

यावर प्रतिक्रिया देतांना अंबादास दानवे म्हणाले, भाजपकडून याकूब मेमन यांच्या कबरीवर लावण्यात आलेल्या एलईडी दिवे प्रकरणी महाविकास आघाडी सरकार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेली टीका हे नादानपणाचे लक्षण आहे. एखादया दहशतवाद्याच्या कबरीवर अशी सजावट केली जात असेल तर ती निश्चितच खेदजनक आणि संतापजनक बाब आहे.

Opposition Leader Ambadads Danve-Dcm Fadanvis News
Raosaheb Danve : उद्धव ठाकरे राज्याची माफी मागा...

यावरून आरोप करतांना भाजपने आधी हे लक्षात घ्यावे, की ही कबर ज्या प्रभागात आहे, त्या प्रभागात त्यावेळी भाजपच्या नगरसेविका होत्या. तसेच याकूब मेमनचा मृतदेह जेव्हा दफनविधीसाठी त्याच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला त्यावेळी हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मग आम्ही त्यांना आणि भाजपला जबाबदार म्हणायचे का?

आम्ही यावर टीका करून राजकारण अजिबात करणार नाही. अशाप्रकारे एका दहशतवाद्याच्या कबरीचे उदात्तीकरण करणाऱ्या दोषींवर कारवाई निश्चित झाली पाहिजे, अशी आमची देखील मागणी आहे, असे सांगत अंबादास दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in