फडणवीस खोटं बोलत आहेत, त्यांना पाणी योजना पक्षाच्या उद्योगपती खासदाराला द्यायची होती..

शिवसेना-भाजप हे दोन पक्षच पाणी प्रश्नाला जबाबदार आहेत, असे इम्तियाज जलील यांनी अधोरेखित केले आहे. (Imitaz Jalil)
फडणवीस खोटं बोलत आहेत, त्यांना पाणी योजना पक्षाच्या उद्योगपती खासदाराला द्यायची होती..
Mp Imtiaz Jalil, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शहाराच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना-भाजप या सर्वाधिक काळ महापालिकेची सत्ता भोगणाऱ्या दोन पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. (Bjp) राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या वादात उडी घेत महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मी दिलेली १६०० कोटींची योजना रद्द झाल्याचा आरोप केला आहे. मुंबईत पाणी प्रश्नावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना फडणवीस माध्यमांशी बोलत होते.

याचाच दाखला देत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधत ते खोटं बोलत असल्याचा दावा ट्विटच्या माध्यमातून केला आहे. (Aurangabad) फडणवीस यांच्या पक्षाच्या राज्य सभेतील एका उद्योगपती खासदाराला स्वार्थासाठी माझ्या शहराचे पाणी द्यायचे होते, असा आरोप इम्तियाज यांनी केला आहे.

औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न पेटला आहे. विशेष म्हणजे शिवसेने सोबत तीन दशके महापालिकेच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या भाजपने मनसेला सोबत घेत तो पेटवला आहे. पाणी प्रश्न हा औरंगाबादकारंच्या जीवन मरणाचा प्रश्न निश्चितच आहे, परंतु राजकारणी मात्र यावरून गेली अनेक वर्ष राजकारणच करत आले आहेत.

औरंगाबादेतील आंदोलनावरून फडणवीस यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी मी शहरासाठी सोळाशे कोटींची योजना दिली होती, पण नाकर्त्या आघाडी सरकारने ती रद्द केली, असे सांगत महाविकास आघाडी सरकारच्या माथी खापर फोडले. याला एमआयएमने उत्तर देत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष औरंगाबादकरांच्या पाणी प्रश्नाला जबादार असल्याचे म्हटले आहे.

Mp Imtiaz Jalil, Aurangabad
Fadanvis : औरंगाबादकरांना मी १६८० कोटींची पाणी योजना दिली , पण या नाकर्त्या सरकारने ती रद्द केली..

फडणवीसांच्या आरोपाचा हवाला देत केलेल्या ट्विटमध्ये खासदार इम्तियाज जलील यांनी संमातर या जुन्या पाणी योजनेचा संदर्भ देत म्हटले आहे की, आपल्या राजकीय स्वार्थासाठी फडणवीस यांना माझ्या शहराचे पाणी हे त्यांच्या पक्षाच्या राज्यसभेतील उद्योगपती खासदाराला द्यायचे होते. त्यामुळे शिवसेना-भाजप हे दोन पक्षच पाणी प्रश्नाला जबाबदार आहेत, असे इम्तियाज जलील यांनी अधोरेखित केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.