Fadanvis : राजकारणात गिफ्ट नाही, सरप्राईज गिफ्ट मिळत असतात, मेटेंनाही ते मिळेल..

मला जसे सरप्राईज गिफ्ट मिळाले आणि मी माजी मुख्यमंत्री राहण्यास तयार असतांना मला उपमुख्यमंत्री व्हावे लागले, तसेचर सरप्राईज गिफ्ट योग्यवेळी मेटे यांना देखील मिळेल. (Devendra Fadanvis)
Deputy Cm Devendra Fadanvis-Vinayak Mete News
Deputy Cm Devendra Fadanvis-Vinayak Mete NewsSarkarnama

मुंबई : राजकारणात गिफ्ट नाही, तर सरप्राईज गिफ्ट महत्वाचे असतात, मला नाही का, मी माजी मुख्यमंत्री म्हणून सत्तेच्या बाहेर राहणार होतो, पण पक्षाने आदेश दिला, सत्तेत सहभागी व्हा आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारा, माझ्यासाठी देखील हे सरप्राईज गिफ्ट होते. त्यामुळे मेटेसाहेब तुम्ही काळजी करू नका, तुम्हालाही असे सरप्राईज गिफ्ट लवकरच मिळेल, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लगावला.

माजी आमदार तथा शिवसंग्रमामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत त्यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती होती. (Maharashtra) यावेळी खासदार भारती लव्हेकर यांनी आपल्या भाषणात विनायक मेटे यांना मंत्रीमंडळात घेऊन त्यांना वाढदिवसाचे गिफ्ट द्या, अशी मागणी केली होती.

याचा संदर्भ फडणवीसांनी आपल्या भाषणात देतांना मेटे आणि आपली मैत्री असल्याचे सांगत ती दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे घट्ट झाल्याचा उल्लेख देखील यावेळी केला. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत विनायक मेटे यांना डावलण्यात आल्याची चर्चा होती. या अभिष्ठचिंतन सोहळ्याचे निमित्ताने त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे पहायला मिळाले. मेटे यांना शुभेच्छा देतांना अनेक नेत्यांनी त्यांना मंत्री्मंडळात स्थान मिळावे, अशी अपेक्षा फडणवीसांच्या समोरच व्यक्त केली.

त्यामुळे फडणीवस यावर काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. फडणवीस म्हणाले, विनायक मेटे हे आमच्यासाठी फक्त एक घटक पक्षच नाही, तर ते माझे चांगले मित्र देखील आहेत. आमच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत कधी झाले हे कळलेच नाही. आमच्या या मैत्रीचे खरे श्रेय आमचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनाच जाते, त्यांच्यामुळे मेटे आणि माझ्यातील ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काम गेल्या अडीच वर्षात पुढे सरकरले नाही, पण आमच्या काळात या संदर्भात जे काम झाले ते केवळ विनायक मेटे यांच्यामुळेच हे सांगायला देखील फडणवीस विसरले नाहीत. भारती लव्हेकर म्हणाल्या की मेटेंना वाढदिवसाचे गिफ्ट द्या. पण राजकारणात गिफ्ट पेक्षाही सरप्राईज गिफ्टला अधिक महत्व असते असे सांगत मेटेंना सबुरीचा सल्ला दिला.

Deputy Cm Devendra Fadanvis-Vinayak Mete News
Shivsena : खैरे म्हणाले गद्दारांची हकालपट्टी होणार अन् युवासेनेच्या जंजाळची उचलबांगडी..

मला जसे सरप्राईज गिफ्ट मिळाले आणि मी माजी मुख्यमंत्री राहण्यास तयार असतांना मला उपमुख्यमंत्री व्हावे लागले, तसेचर सरप्राईज गिफ्ट योग्यवेळी मेटे यांना देखील मिळेल, असे फडणवीस म्हणाले. आज अवघड वाटेवरून जात असल्याचा उल्लेख करत मागील अडीच वर्षात अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, सारथी, मराठा विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासह मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काहीच झाले नाही, असे सांगत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

जे सरकारच्या हातात होतं ते देखील केलं नाही. मराठा आरक्षण व इतर प्रश्न सोडवण्यासाठी गठीत केलेली उपसमिती काय करत होती? असा प्रश्न देखील फडणवीस यांनी उपस्थितीत केला. या प्रश्नाला आधीचे मुख्यमंत्री किती वेळ द्यायचे माहित नाही. पण आम्ही खुर्च्या तोडायसाठी सत्तेवर आलेलो नाहीत, समाजाच्या शेवटच्या घटकाला आर्थिक लाभ मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्राच्या रखडलेल्या कामाला आता गती देण्यात येईल, त्यासाठी मेटेंना घेऊन लवकरच आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in