Beed : वीस महिन्यांपासून कारखाना ऊस नेत नाही ; शेतकऱ्याने रस्त्यावर संसार मांडला

जोपर्यंत ऊस नेला जात नाही तोपर्यंत रस्त्यावरच संसार मांडणार, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. (Beed News)
Sugarcane Farmer In Beed District
Sugarcane Farmer In Beed DistrictSarkarnama

बीड : अतिरिक्त ऊस कारखाना नेत नाही म्हणून एका तरूण शेतकऱ्याने दोन एकर ऊस पेटवून देत आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांनाच आता आणखी एका शेतकऱ्याने आपला संसार थेट रस्त्यावर मांडत कारखानदार आणि प्रशासकीय यंत्रणेचा निषेध नोंदवला आहे. (Beed) अंबाजागाई तालु्क्यातील रविंद्र ढगे या ऊस उत्पादक शेतकऱ्याने (Farmer) एक व्हिडिओ शेअर करत आपली व्यथा मांडली आहे.

जिल्ह्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. धानोरा खुर्द (ता. अंबाजोगाई) येथील रवींद्र ढगे या शेतकऱ्याने ऊसाचे (Sugarcane) गाळप होईना म्हणून कुटूंबियांसह रस्त्यावर बसून आंदोलन सुरू कले आहे. हे आंदोलन नाही तर व्यवस्थेने आपले घर रस्त्यावर आणल्यामुळे आपण इथे राहत असल्याचे उद्विगन पणे सांगत या शेतकऱ्याने संताप व्यक्त करत रस्त्यावरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. (Marathwada)

मराठवाड्यातील बीड, लातूरसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही दिवसांपुर्वी गेवराई येथी एका तरूण ऊस उत्पादक शेतकऱ्याने दोन एकर ऊस पेटवून देत गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे संपुर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन करतांनाच संपुर्ण ऊसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. शिवाय ठाकरे सरकारने अतिरिक्त ऊसाला अनुदानाची घोषणा देखील केली.

Sugarcane Farmer In Beed District
Beed : अजित पवारांचा ‘स्मॅश’ : एकाच वर्षात एमपीएससीच्या पाच परीक्षा क्रॅक

परंतु असे असले तरी अतिरिक्त ऊसाचे गाळप होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील रविंद्र ढगे यांनी गेल्या ३० तारखेपासून कारखान्याने ऊस न्यावा म्हणून प्रयत्न केले, परंतु त्यांचा ऊस नेला जात नाहीये. यंत्राणे कापणी करायची तर त्यालाही कोणी तयार होईना. त्यामुळे वैतागलेल्या ढगे यांनी कारखानदार, प्रशासकीय यंत्रणा यांच्यावर आरोप करत त्यांच्यामुळेच आज आपला संसार आणि घर रस्त्यावर आल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करणारा व्हिडिओ जारी केला आहे.

जोपर्यंत ऊस नेला जात नाही तोपर्यंत रस्त्यावरच संसार मांडणार, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. अप्पर जिल्हाधिकारी, तहसिलदार यांनी आदेश देऊन देखील ऊस नेला जात नसल्यामुळे कारखानदार हे भांडवलदार झाले असल्याचा आरोप देखील ढगे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com