Ambadas Danve allegations on commissioner : पोलिस आयुक्तांच्या आशिर्वादाने हप्तेखोरी, अवैध धंदे सुरू..

Shivsena : राज्याच्या गृहमंत्र्यांना देखील या संदर्भात मी पत्र देवून चौकशी आणि कारवाईची मागणी करणार आहे.
Ambadas Danve allegations on commissioner  News
Ambadas Danve allegations on commissioner NewsSarkarnama

Chhatrapati Sambhjainagar : छत्रपती संभाजीगनर शहरातील किराडपुरा भागात काही दिवसांपुर्वी झालेल्या दंगलीवरून पोलिसांवर राजकीय नेत्यांकडून आरोप केले जात आहेत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दंगलीला पोलिसच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील किराडपुरा दंगल पोलिसांनी व्यवस्थीत हाताळली नसल्याचा आरोप करतांनाच शहरात अवैध धंदे आणि हप्तेखोरी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे म्हटले आहे.

Ambadas Danve allegations on commissioner  News
Gangapur Constituency News : माने पिता-पुत्रांच्या बीआरएस प्रवेशाने राष्ट्रवादीच्या चव्हाणांचा मार्ग मोकळा..

या संदर्भातील सविस्तर पत्र आपल पोलिस महासंचलाकांना पाठवले असून संबंधितांवर कारवाई झाली नाही, तर आपण गृहमंत्र्यांना (State Home Minister) देखील पत्र पाठवू तसेच येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा सभागृहात मांडू, असेही दानवे यांनी स्पष्ट केले आहे. (Shivsena) अंबादास दानवे यांनी शहरातील हप्तेखोरी आणि अवैध धंद्यासंदर्भात पाठवेल्या पत्राचा उल्लेख करत `सरकारनामा`ला सांगितले की, छत्रपीत संभाजीनगर शहराला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. किराडपुरा येथील दंगलीमुळे शहरातील वातावरण बिघडले आहे, शिवाय बदनामी देखील झाली आहे.

याला पोलिस आयुक्त डाॅ.निखील गुप्ता आणि त्यांची यंत्रणा जबाबदार आहे. किराडपुरा भागात झालेली दंगल आणि ती हाताळतांना पोलिसांची भूमिका ही संशयास्पद होती. (Marathwada) पोलिस आयुक्तांनी तातडीने दंगलग्रस्त भागात जावून परिस्थिती हाताळणे गरजेचे असतांना त्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली. दंगेखोर पोलिसांची वाहने जाळत असतांना अतिरिक्त मदत वेळेवर पोहचली नाही. त्यामुळे दंगल अधिक भडकली. याला पोलिस आयुक्तच जबाबदार आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.

एवढेच नाही तर शहरात अवैध धंद्याचा देखील सुळसुळाट सुरू आहे. गुटखा, दारूची अवैध विक्री, नशेखोरीचे प्रकार आणि त्यातून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाईन शाॅप, व्यापारी, उद्योजकांकडून हप्ते वसुली सुरु आहे. पोलिस स्टेशन आणि तेथील अधिकाऱ्यांच्या नावासह माझ्याकडे यादी आहे. हे सगळं वरिष्ठांचे आशिर्वाद असल्याशिवाय शक्य नाही.

पोलिस आयुक्त याला जबाबदार आहेत आणि म्हणून मी या सगळ्या प्रकाराची तक्रार पोलिस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे. याची दखल घेवून शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांवर, पोलिसांच्या हप्तखोरीवर कारवाई झाली नाही, तर राज्याच्या गृहमंत्र्यांना देखील या संदर्भात मी पत्र देवून चौकशी आणि कारवाईची मागणी करणार आहे. शिवाय अधिवेशनात सभागृहात देखील मी हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com