Marathwada : एसी गाडीत फिरून ओला दुष्काळ नाही म्हणणाऱ्या सत्तारांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा..

शेतकरी आत्महत्या करता आहेत आणि हे एसी गाडीत बसून ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती नसल्याचे सांगत आहेत. एकदा गावात येवून बघा, गावगाड्याचा मसनवटा झाला आहे. ( Jalna Congress)
Minister Abdul Sattar News, Jalna
Minister Abdul Sattar News, JalnaSarkarnama

औरंगाबाद : राज्यात व विशेषतः मराठवाड्यात परतीच्या पावसाने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या आयुष्यात अंधार केला. काढून ठेवलेले आणि शेतात उभे असलेले अशी दोन्ही पीके हातची गेल्याने बळीराजा खचला. तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. तर दुसरीकडे ज्या कृषीमंत्र्यांवर शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली तेच बेजबाबदार विधानं करत आहेत. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असे विधान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्यानंतर त्यांच्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड संताप आहे.

Minister Abdul Sattar News, Jalna
High Court : वित्त, ग्रामविकास विभागाच्या सचिवांना नोटीस, जबाब दाखल करण्याचे आदेश..

या संतापातूनच जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात (Congress) काॅंग्रेसने आंदोलन करत सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टीची मागणी केली आहे. एसी गाडीत बसून तुम्हाला ओला दुष्काळ दिसणार नाही, असा संताप देखील आंदोलकांनी व्यक्त केला. (Abdul Sattar) कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करतात, शेतकऱ्यांच्या घरी जावून राहतात, दिवाळी देखील त्यांच्यासोबत साजरी करतात.

तरीही त्यांना शेतकऱ्यांचे दुःख कळत नाही. अजून किती पाऊस पडला म्हणजे, त्यांना ओला दुष्काळ असल्याची जाणीव होईल. पंचनाम्याची नाटकं बंद करा आणि शेतकऱ्याला सरसकट मदत करा, अशी मागणी देखील आंदोलक काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली.अतिवृष्टी, सततचा आणि आता परतीच्या पावसाने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. त्यामुळे तात्काळ सरकट शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करून त्याला दिलासा दिला पाहिजे. सत्तार यांना अजून किती पाऊस पाहिजे म्हणजे ते दुष्काळा जाहीर करतील.

शेतकरी आत्महत्या करता आहेत आणि हे एसी गाडीत बसून ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती नसल्याचे सांगत आहेत. एकदा गावात येवून बघा, गावगाड्याचा मसनवटा झाला आहे. पण तुम्हाला ते दिसणार नाही, कारण सत्ता सुंदरीचा स्पर्श झाल्याने तुमच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली आहे. पण या शेतकऱ्यांनीच तुम्हाला मंत्रीपदावर बसवले आहे आणि आता तुम्हाला ओला दुष्काळ दिसत नाही. येणाऱ्या काळात याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असा इशारा देखील काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष रामप्रसाद खरात यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com