सगळं माझ्याच गल्ल्यात; असे पालकमंत्री अन् आमदारांचे काम

धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणावर कोणतेच स्टेटमेंट नाही, कोणत्या तोंडाने लोकासमोर येतात. आरक्षण द्या नाहीतर नका देऊ आमची दुकानं चालली पाहिजे. (Pankaja Munde)
Pankaja Munde

Pankaja Munde

Sarkarnama

बीड : मागचे दोन वर्षे सरकार पडणार, कधी पडणार याची चिंता करण्यापेक्षा सामान्यांच्या प्रश्नांवर काम करा, असा सल्ला देणाऱ्या भाजपच्या (Bjp) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आता मात्र सरकारचे भवितव्य चांगले नसल्याचे आणि सरकार लवकरच पडणार, असल्याची भविष्यवाणी केली. तसेच सगळं आपल्याच गल्ल्यात आलं पाहीजे, असे जिल्ह्यात पालकमंत्री आणि राष्ट्रवादीच्या (Ncp) आमदारांच काम असल्याची टीकाही केली.

सध्या जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. शनिवारी पाटोदा येथील सभेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी निवडणुकांत विजय द्या, प्रत्येक नगर पंचायतींना शंभर कोटींचा निधी आणू, असे आश्वासन दिले होते. त्याला पंकजा मुंडे यांनी टोला लगावत, दोन वर्षे काय केले, असा सवाल केला.

जिल्ह्यात पालकमंत्री आणि आमदार फक्त गल्ला भरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या सरकारचं भवितव्य चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे, त्याची सुरुवात नगर पंचायतीतून करा, असे आवाहनही त्यांनी केले.

<div class="paragraphs"><p>Pankaja Munde</p></div>
जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत सत्तार-काळे बागडेंचा गेम करणार?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा सुरू असल्याने कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये आनंद आहे. बऱ्याच दिवसानंतर शहा महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यामुळे बरं वाटायला लागलं आहे, असं म्हणत महाविकास आघाडीचे कबाड निघणार आहे, अशी टीकाही पंकजा मुंडे यांनी केली. याला जेलमध्ये घालू त्याला जेल मध्ये घालू, असे म्हणाणारा पालकमंत्री पाहिजे का? कुणाचं घर बरबाद करायचं असं राजकारण दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी शिकवलं नाही, असंही त्या म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणावर कोणतेच स्टेटमेंट नाही, कोणत्या तोंडाने लोकासमोर येतात. आरक्षण द्या नाहीतर नका देऊ आमची दुकानं चालली पाहिजे, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना वाटतं, असा टोलाही पंकजा यांनी यावेळी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com