Atul Save News : मी मंत्री असलो तरी छत्रपती संभाजीनगरच्या मुद्यावर बोलवालं तिथे येईन..

Bjp : एमआयएमला जशासतसे उत्तर द्यायला आम्ही सज्ज आहोत.
Minister Atul Save News
Minister Atul Save NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : नामांतराच्या समर्थनार्थ आणि विरोधातील राजकारण शहरात चांगलेच पेटले आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)असे नामांतर केंद्राने अधिकृत केल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये श्रेय आणि विरोधासाठी चढाओढ सुरू झाली आहे.

Minister Atul Save News
Shivsena News: शिवगर्जनेत उपराजधानीकडे ठाकरेंचे दुर्लक्ष, पण ‘शिवधनुष्य’ साठी शिंदे येणार !

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू आहे. तर शिवसेनेने सकल हिंदु एकत्रिकरण मेळावा घेत जशासतसे उत्तर देण्याची तयारी दर्शवली आहे. याच मेळाव्यात राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी मी सरकारमध्ये आणि पदावर असलो तरी छत्रपती संभाजीनगरच्या मुद्यावर मला कुठेही बोलवा मी येण्यास तयार असल्याची ग्वाही दिली.

अतुल सावे म्हणाले, हिंदूहद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम या शहराचे नाव संभाजीनगर केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांचे हे स्वप्न सत्यात आणि अधिकृत करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. येथील जनतेने देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

परंतु काही मंडळी राजकीय स्वार्थासाठी विरोध करत उपोषणाला बसले आहेत. पण केंद्राने नामांतरावर मोहर उठवली असल्याने त्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांनी उपोषणस्थळावर औरंगजेबाचे पोस्टर झळकवले होते. भाजपने टीव्ही सेंटर येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच औरंगजेबाच्या पोस्टरची होळी केली.

त्यामुळे एमआयएमला जशासतसे उत्तर द्यायला आम्ही सज्ज आहोत. मंत्री असल्याने मला जास्त बोलता येणार नाही, पण तुम्ही सांगाल तेव्हा आणि सांगाल तिथे मी तुमच्या सोबत येईन, याचा पुनरुच्चार देखील सावे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com